Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरणगाव ग्रामपंचायतीला सदस्य ठोकणार टाळे

ग्रामसेवक व सरपंच यांचा मनमानी कारभार गटविकास अधिकार्‍यांची पाठराखण

जामखेड ः तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायत मध्ये अनागोंदी, भ्रष्टाचार कारभाराच्या अनेक वेळा तक्रारी केल्या. चौकशी करून कारवाई करण्याचे गटविकास अधिका

शिर्डीत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर काँगे्रसचा मोर्चा
नागपुरात आढळला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण
नगरमध्ये किराणा दुकानातून 18 हजाराच्या तांदळाची चोरी

जामखेड ः तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायत मध्ये अनागोंदी, भ्रष्टाचार कारभाराच्या अनेक वेळा तक्रारी केल्या. चौकशी करून कारवाई करण्याचे गटविकास अधिकारी यांनी लेखी दिले मात्र एक वर्ष झाले चौकशी झाली नाही किंवा कोणती कारवाई झाली नाही. एकुणच सर्व संगनमताने होत असलेल्या भ्रष्टाचार व अनागोंदी कारभारामुळे त्रासलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही खाली सह्या करणारे अरणगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहोत, आम्ही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्याकडे दिनांक 27 फेबु्रवारी 2023 रोजी अरणगाव ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचार, अनियमिता व अपसंपतेच्या अपहाराबद्दल तक्रार अर्ज दाखल केला होता, त्यावेळी 13 एप्रिल 2023 रोजी चौकशी पूर्ण करून दिनांक 21 एप्रिल 2023 अगोदर अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिलेले होते परंतु आजतागायत अरणगाव ग्रामपंचायतची कुठलीही चौकशी झालेली नाही अथवा कोणीही अधिकारी अरणगाव ग्रामपंचायतची चौकशी करण्यासाठी आलेले नाहीत. तसेच अरणगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने सर्व कारभार मनमानी पद्धतीने चालू आहे. मासिक मिटिंग, ग्रामसभा वेळोवेळी घेतल्या जात नाहीत. गेली चार महिने झाले मासिक मीटिंग झालेली नाही तसेच दोन वर्षापासून ग्रामसभा देखील गावांमध्ये आयोजित केलेली नाही सर्व कारभार केवळ कागदोपत्री चालू आहे तसेच माहितीच्या अधिकारात मागितलेली कसलीही माहिती अपील करून देखील आम्हाला दिली जात नाही. याबाबत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांना प्रत्यक्ष भेटून लवकरात लवकर चौकशी करण्याबाबत अनेक वेळा लेखी तोंडी विनंती केली होती परंतु गटविकास अधिकारी या गंभीर विषयाबाबत कायम टाळाटाळ करतांना दिसत आहेत व भ्रष्टाचार करणार्‍यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनाद्वारे केला आहे. त्यामुळे दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी अरणगाव ग्रामपंचायतला टाळे ठोकून गटविकास अधिकारी ,सरपंच व ग्रामसेवक यांचा निषेध व्यक्त करणार आहे, तसेच जोपर्यंत आमच्या तक्रार अर्जाची उच्चस्तरीय चौकशी होत नाही व आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अरणगाव ग्रामपंचायतचे कामकाज चालू देणार नाही, यावेळी जी परिस्थीत निर्माण होईल यास पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील असे ग्रामपंचायत सदस्य गजराबाई चंद्रकांत पारे, रूपाली शंकरराव गदादे, रब्बाना सादिक शेख, तात्यासाहेब बलभीम निगूडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS