आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले असून महाराष्ट्रात दिवसेंदिवस बाधितांची संख्या उच्यांक गाठत आहे.

एकही मृत्यू होऊ देणार नाही : धनंजय मुंडे | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24 |
करंजी परिसराला वादळी वार्‍यांसह गारांचा फटका
झाडाखाली उभी असलेली बस जळून खाक

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले असून महाराष्ट्रात दिवसेंदिवस बाधितांची संख्या उच्यांक गाठत आहे. तसेच कोपरगाव शहरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण रुग्णालया बरोबर खाजगी दवाखान्यांमध्ये देखील बेडसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांचे हाल होत आहेत. 
या कठीण व भयावह परिस्थितीत मात्र कोपरगाव नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून कोपरगाव शहरातील जनतेला अविरत सेवा पुरवत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या अनेक बेवारस लोकांचा अंत्यसंस्कार करणे व कोरोना बाधित रुग्णांच्या मेडिकल वेस्टची विल्लेवाट लावण्याचं काम हे सर्व कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावत रोजच करत आहेत. एकीकडे कोरोना झाल्यावर जेथे घरची माणसं व नातेवाईक जवळ येत नसल्याचं दृष्य आहे तर दुसरीकडे माणुसकी जपणारे हे सफाई कर्मचारी. तसेच सर्व हॉस्पिटल मधील डॉक्टर,नर्स,वॉर्ड बॉय, आरोग्य कर्मचारी व इतर स्टाफ सुध्दा आपल्या जीवाची बाजी लावत अहोरात्र रुग्णांना सेवा देण्याचं काम करत आहेत. या सर्व मंडळींना देखील त्यांचा परिवार आहे, त्यांच्यामुळे त्यांचे परिवार देखील धोक्यात येऊ शकते हे कटू सत्य माहित असून देखील कोपरगावला कोरोना मुक्त करण्यासाठी हे कौतुकास्पद कार्य हे सर्व करत आहेत. कुठे रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी काळा बाजार करणारे काही मेडिकलवाले,ज्यांना आपण उच्चभ्रु व प्रतिष्ठित समजतो असे रुग्णांची हतबलता पाहून आवाचे-सवा बिल आकरणारे आणि कट प्रॅक्टिस करणारे काही डॉक्टर्स आणि कुठे हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र निःस्वार्थपणे सेवा देऊन कर्तव्य बजावणारे दुर्लक्षित व उपेक्षित आरोग्य कर्मचारी.या कठीण परिस्थितीत अमर्यााद लुटमार करणाऱ्या मेडिकल व डॉक्टर्सला ईश्र्वर सद्बुद्धी देवो व निरपेक्षपणे कर्तव्य बजावणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना उदंड व निरोगी आयुष्य मिळो हीच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना. रामनवमी निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा.   कोपरगाव शिवसेनेकडून या सर्व योध्यांना मानाचा मुजरा कारण कोपरगावला कोरोना पासून मुक्त करण्यामध्ये नक्कीच या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असणार आहे. कोपरगावची सुज्ञ जनता नेहमीच आपली ऋणी राहिल अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली. कोपरगाव नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी यांनी हे अविलक्षणीय काम करून सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. कोपरगाव शिवसेनेकडून या सर्वांचे मनःपूर्वक आभार अशी प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल यांनी दिली.

COMMENTS