Homeताज्या बातम्यासंपादकीय

नबावावरून बेबनाव

राज्यात विधिमंडळाच्या अधिवेशनाला नुकतीच सुरूवात झाली असून, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेबनवाव होतांना दिसून येत आहे, त्याचे प्रमुख कारण म्हणज

माणूसकी ओशाळली
जागावाटपांतील नाराजीनाट्य
जुन्या पेन्शनचा नवा प्रश्‍न

राज्यात विधिमंडळाच्या अधिवेशनाला नुकतीच सुरूवात झाली असून, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेबनवाव होतांना दिसून येत आहे, त्याचे प्रमुख कारण म्हणजे अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक जामिनावर सुटका झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनाला हजर झाले आहेत. खरंतर नवाब मलिकांवर भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांना एका जमीन घोटाळ्यात थेट दाऊद इब्राहीमची बहीन हसीना पारकरने मदत केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. टेरर फंडिगंच्या नावाखाली हा पैसा वापरण्यात येत असल्यामुळे देशद्रोह्याच्या गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते. त्यानंतर नवाब मलिक अनेक वर्षे तुरुंगात होते. त्यानंतर त्यांच्या सुटकेची कोणतेही चिन्हे नव्हते. मात्र राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर नवाब मलिकांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला, असेच म्हणावे लागेल. खरंतर भाजपने ठाकरे गट आणि राष्ट्रवादीविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचे यापूर्वीच दिसून येत होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर होते. मात्र अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मात्र ही कारवाई गुंडाळण्यात आली. याचबरोबर फोडा-फोडीच्या राजकारणात आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नांवर भाजपमधील नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक टीका झाली. त्यामुळे त्यांची प्रतिमा चांगलीच डागाळली होती. त्यामुळे फडणवीस यांनी बरेच दिवस मौन बाळगले. त्यामुळे आत्ता कुठे त्यांच्याविषयीचा जनमानसातील रोष कमी होतांना दिसून येत आहे. त्यातच भाजपला तीन राज्यात मिळालेले यश यामध्ये फडणवीस यांची भूमिका महत्वाची होती. त्यामुळे फडणवीस रोषाच्या राजकारणातून बाहेर येतांना दिसून येत आहे. अशावेळी नवाब मलिकांविषयी भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या रोषाचे धनी आपण व्हायला नको, म्हणूनच फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिले. नुसते पत्रच लिहिले नाही तर, ते माध्यमांत व्हायरल होईल, याची तजवीज केली. यामागचे दोन प्रमुख कारणे आहेत. एकतर फडणवीस अजित पवारांच्या कानात सांगू शकले असते, किंवा त्यांना गोपनीय पत्र देऊन मलिक आपल्याला नको आहेत, अशी भूमिका मांडता आली असती. मात्र त्यांनी हे पत्र खुले करून, फडणवीसांनी आपली प्रतिमा उजळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अजित पवार गट बॅकफूटवर जातांना दिसून येत आहे. या पत्रातील भाषेकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आजमितीस युतीमध्ये नवाब मलिकांना स्वीकारता येणार नाही, मात्र उद्या त्यांच्यावरील डाग पुसले गेले तर, त्यांना स्वीकारता येईल, असा हा रोख दिसून येतो. राज्यातच नव्हे तर देशभरात आगामी निवडणुका होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी भाजप आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. कारण काही महिन्यांपूर्वी राज्यातील वातावरण भाजपच्या विरोधात जातांना दिसून येत आहे. मात्र हा रोष भाजपने हळू-हळू कमी केला आहे. आणि आपली विकासाची भूमिका आणि राजकारण पुन्हा एकदा रूळावर आणले आहे. अशा परिस्थितीत नवाब मलिकांचे समर्थन भाजपला योग्य ठरणारे नव्हते. खरंतर मलिक आज वैद्यकीय जामिनावर बाहेर आले आहे. उद्या पुन्हा ते तुरूंगात जाऊ शकतात. अशावेळी त्यांना किती जवळ करावे आणि किती दूर करावे, याचा हिशोब अजित पवार गटाला करावा लागणार आहे. तर दुसरीकडे मलिकांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. एकीकडे पवार साहेबांची साथ सोडली आहे, दुसरीकडे अजित पवारांशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला तर, भाजपने त्याला विरोध केला आहे, त्यामुळे मलिकांची मात्र गोची झाली आहे. 

COMMENTS