Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड बाजार समितीत ईश्‍वर चिठ्ठीचा कौल भाजपला

सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास वराट

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे पै. शरद कार्ले तर उपसभापतीपदी आ. रोहीत पवार गटाचे कैलास वराट यांची निवड झाली आहे. 16 र

मेंढपाळांना पिस्तुल व परवाना द्या ; संघर्ष समितीच्या शेंडगेंची मागणी
नगरमध्ये चार ठिकाणी दरोडे, लाखो रुपयांचा ऐवज लुटला
एस. एस. जी. एम. महाविद्यालयात होणार गुणवंतांचा सत्कार

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे पै. शरद कार्ले तर उपसभापतीपदी आ. रोहीत पवार गटाचे कैलास वराट यांची निवड झाली आहे. 16 रोजी बाजार समितीच्या सभापती निवडीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दोन्ही पॅनलला 9-9 असे समान मतदान झाल्याने ईश्‍वराच्या चिठ्ठीद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला.
बाजार समितीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आ. राम शिंदे व आ. रोहित पवार यांच्या दोन्ही पॅनलला एकुण 18 जागांपैकी समसमान अशा 9-9 जागा मिळाल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत आ. राम शिंदे यांच्या पॅनलकडून सभापती पदासाठी शरद कार्ले तर उपसभापती पदासाठी सचिन घुमरे तर आ. रोहित पवार यांच्या पॅनलकडून सभापती पदासाठी सुधीर राळेभात तर उपसभापती पदासाठी कैलास वराट यांचे उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र निवडणूक प्रक्रियेत दोन्ही पॅनलला  9-9 असे समान मत पडली. शेवटी ईश्‍वर चिठ्ठीच्या साहाय्याने सभापतीपदी शरद कार्ले तर उपसभापती पदी कैलास वराट यांची निवड करण्यात आली. यावेळी सभापतीपदासाठी पुजा जाट तर उपसभापती पदासाठी रिध्दी जाट या दोन बहिणींनी चिठ्ठ्या काढल्या. दुपारी 1:00 ते 3:30 वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू होती.  यावेळी निवडणूक प्राधिकृत अधिकारी म्हणून विशेष जिल्हा लेखा परीक्षक आर. एस. निकम यांनी काम पाहिले. तर त्यांना सहकार्य म्हणून निलेश मुंडे, प्रकाश सैंदाने तसेच बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद यांनी काम पाहिले. सभापती शरद कारले उपसभापती कैलास वराट यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

आमदार रोहित पवारांना मोठा धक्का – कर्जत-जामखेडमध्ये एकहाती सत्ता मिळवू पाहणार्‍या आमदार रोहित पवारांना जामखेड बाजार समितीत चांगलाच धक्का मिळाला असून, राष्ट्रवादी आणि भाजपला समसमान 9-9 जागा मिळाल्या होत्या. मंगळवारी ईश्‍वराच्या चिठ्ठीने देखील आमदार रोहित पवारांना धक्का देत आमदार प्रा. राम शिंदेंच्या पारड्यात मत टाकल्यामुळे आमदार रोहित पवारांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS