नांदेड: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदेड

नांदेड: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदेड शहरातील सराफा परिसरातील नगरेश्वर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम युवा सेनेचे गणेश पेन्सिलवार यांच्या पुढाकाराने उत्साहात आयोजित करण्यात आला होता.
नगरेश्वर प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सामाजिक व राष्ट्रीय मूल्ये जोपासण्याचा मोलाचा संदेश दिला. मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहिताची जाणीव जपत शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनील दाचावार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, बालाजी कल्याणकर, सचिन पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख अशोक पावडे, डॉ. देवकते, उपशहर प्रमुख खाजाबाई, प्रमोद सावंत, कामगार सेनेचे मनीष झगडे, मंदार जोशी, गौरव यादव, सनी परदेशी, अक्षय यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पवन मामीडवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गणेश पेन्सिलवार यांनी मानले. नगरेश्वर शैक्षणिक संस्था ही सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर राहिल्याचे पेन्सिलवार यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

COMMENTS