Homeताज्या बातम्यासंपादकीय

प्रदूषणामुळे मिळेना शुद्ध हवा

भारतीय संविधानाने कलम 21 मध्ये जीवित व व्यक्तीगत स्वातंत्र्यांची सखोल आणि विस्तारपूर्व व्याख्या केली आहे. यामध्ये देशातील प्रत्येक व्यक्तीचा शुद्

इस्त्रोची गगनभरारी
लोकशाहीतील सोयीचे राजकारण
संसदेची सुरक्षा आणि त्या तरूणांची मानसिकता

भारतीय संविधानाने कलम 21 मध्ये जीवित व व्यक्तीगत स्वातंत्र्यांची सखोल आणि विस्तारपूर्व व्याख्या केली आहे. यामध्ये देशातील प्रत्येक व्यक्तीचा शुद्ध हवा मिळवण्याचा मूलभूत हक्क म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांपासून सर्वसामान्य माणूसच नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिक शुद्ध हवा मिळवण्यापासून वंचित राहतांना दिसून येत आहे. त्यामुळे शुद्ध हवा आता दुर्मिळ होतांना दिसून येत आहे. त्यामुळे मानवी आयुर्मान सुद्धा घटतांना दिसून येत आहे. त्यामुळे जर भविष्यात शुद्ध हवा हवी असेल आणि मानवाचे जीवन जर वाचवायचे असेल तर आज सर्वांना वायू प्रदुषण कमी करण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. कारण झाडे मोठ्या प्रमाणावर हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि आपल्याला आवश्यक असणारा ऑक्सिजन सोडतात. तरच आपल्याला शुद्ध हवा मिळू शकेल. अन्यथा आगामी काळात हवा शुद्धीकरणासाठी टाळेबंदी करण्याची वेळ आपल्यावर येणार आहे, यात शंकाच नाही. आज इंधनांच्या गाड्याकडून आपण इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळतांना दिसून येत आहे. मात्र इतर बाबींकडे आपण दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. प्रकृती निकोप राखण्यासाठी मानवाला सकस आहाराबरोबर स्वच्छ आणि शुध्द हवेची आवश्यकता आहे. हवेतील प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच वनस्पती आणि इतर जीवसृष्टीवर होतो. हवा वेगवेगळया वायूंच्या मिश्रणाने बनली आहे. त्याचे प्रमाण सर्वसाधारण परिस्थितीत कायम असते. यापैकी काही घटक आपल्याला आवश्यक असतात, काही निरूपयोगी असतात तर काही घातक असतात. आवश्यक घटकांचे प्रमाण जास्त व अनावश्यक घटकांचे प्रमाण कमी राहून त्या दोहोत नैसर्गिक समतोल राखला गेलेला असतो. मात्र याकडे आपण दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. शुद्ध हवा मिळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम अर्थात एनसीएपी कार्यक्रम राबवला जातो. त्यासाठी आतापर्यंत केंद्राने विविध राज्यांना 9 हजार 319 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. मात्र हा निधी पाण्यात जातांना दिसून येत आहे. कारण त्यामानाने हवा शुद्ध मिळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरतांना दिसून येत आहे. देशामध्ये 2017 मध्ये राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम हाती घेण्यात आली. आजमितीस या कार्यक्रमाला हाती घेवून सहा वर्षांचा कालावधी पूर्ण होत असले तरी, प्रदूषणाची समस्या गंभीर होतांना दिसून येत आहे. त्यामुळे वायूप्रदूषण रोखणे, हवा शुद्ध मिळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे, औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाहीत. या गोष्टींकडे आता अजून दुर्लक्ष केले तर आपल्या भावी पिढयांना याचा खूप त्रास होऊ शकतो. जितक्या मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञान वाढत चालले आहे, तितक्याच प्रमाणात प्रदूषण देखील वाढत चालले आहे. प्रदूषण ही गुंतागुंतीची समस्या बनत चालली आहे. वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, औद्योगिक कचरा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर अश्या अनेक कारणामुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे. प्रदूषण ही समस्या आता फक्त भारतापुरती मर्यादित नसून जगभरात देखील ही समस्या खूप वाढत आहे. वाढते प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल, पेट्रोल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमानवाढ, उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात. हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते. वाहनांचा, कारखान्यातील यंत्र, वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण होते.

COMMENTS