Homeताज्या बातम्यासंपादकीय

संसदेची सुरक्षा आणि त्या तरूणांची मानसिकता

भारतीय जनतेचे प्रतिबिंब म्हणून ज्या संसदेकडे पाहिले जाते, त्याच संसदेच्या सुरक्षेचे बुधवारी धिंडवडे उडाले. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी 21 वर्षांपू

इंडियातील जागावाटपांचा घोळ
काँगे्रसला नवसंजीवनी मिळेल का ?
काँग्रेस मधील बेबंदशाही

भारतीय जनतेचे प्रतिबिंब म्हणून ज्या संसदेकडे पाहिले जाते, त्याच संसदेच्या सुरक्षेचे बुधवारी धिंडवडे उडाले. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी 21 वर्षांपूर्वी याच दिवशी संसदेवर हल्ला केला होता, त्याच दिवशी पुन्हा एकदा संसदेच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होतांना दिसून येत आहे. संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन सभागृह असून, या सभागृहामध्ये अधिवेशनानिमित्त लोकसभेतील 545 आणि राज्यसभेत 250 च्या आसपास खासदारापैंकी बहुतांश खासदार उपस्थित असतात. अशावेळी या संसदेमध्ये दोन तरूणांनी लोकसभेत तर दोघांनी संसदेबाहेर गोंधळ घातला. विशेष म्हणजे या तरूणांनी लोकसभेमध्ये पिवळ्या स्मोकचे कँडल हवेत उडवले, यामुळे काही काळ सभागृहामध्ये धूळ निर्माण होवून, गोंधळ उडाला होता. मात्र खासदारांनी या तरूणांना पकडून चोप दिला. मात्र यानिमित्ताने संसदेच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. खरंतर या तरूणांकडे कोणतेही घातक शस्त्र नव्हते, शिवाय त्यांचा उद्देश कुणालाही इजा पोहचोवणे हा नव्हता, त्यामुळे म्हणावे इतके नुकसान झाले नाही, मात्र त्यांच्याजागी जर दहशतवादी असते, तर काय गोंधळ उडाला असता, ते शब्दात सांगता येणार नाही. त्यामुळे लोकसभेच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे लोकसभा सचिवालयातील 8 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. रामपाल, अरविंद, विरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी कर्मचार्‍यांची नावे आहेत. खरंतर कर्मचार्‍यांना निलंबित करून, हा प्रश्‍न सुटणारा नाही. तर यानिमित्ताने अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे, त्याचा शोध घेण्याची खरी गरज आहे. या तरूणांनी भगतसिंग नावाचा एक गु्रप तयार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भगतसिंग यांनी स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा तेव्हाच्या असेंब्ली हॉलमध्ये अधिवेशन सुरू असतांना, आवाजाचे बॉम्ब फोडत बहिर्‍या झालेल्या सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता, तसाच या आरोपींचा उद्देश होता का, याचाही शोध घेण्याची गरज आहे. या तरूणांचे दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नाही, शिवाय त्यांना कोणताही घातपात करायचा नव्हता, मग त्यांनी इतकी मोठी जोखीम का उचलली? हा महत्वाचा प्रश्‍न आहे. शिवाय तरूणांमध्ये संतापाची किती लाट आहे, याचीही दखल राज्यकर्त्यांनी घेण्याची गरज आहे. विरोधक सुरक्षेच्या मुद्दयावरून लोकसभेत सत्ताधार्‍यांची कोंडी करत आहे, मात्र या तरूणांनी असे कृत्य का केले, याच्यावर कुणीही बोलायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.

तर पास देणारा खासदारच दोषी – सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे लोकसभा सचिवालयातील 8 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले असले तरी,  लोकसभा सचिवालयाने पास देणार्‍या खासदारावर देखील कारवाई करण्याची खरी गरज आहे. कारण ज्या खासदाराने या तरूणांना पास दिले, त्या खासदाराने या तरूणांचा लोकसभेत उपस्थित राहण्याचा उद्देश जाणून घेतला का? ते तरूण संबंधित खासदाराच्या ओळखीचे होते का ? त्या तरूणांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी कुणी खासदार मोहदयांकडे शिफारस केली होती का? आदी अनेक प्रश्‍नांचे उत्तर अजूनही अनुत्तरित असल्यामुळे सर्वप्रथम खासदाराची चौकशी होवून त्यांच्यावरच कारवाई होण्याची गरज आहे.

लोकसभेत गोंधळ घालण्याचा उद्देश काय ? – ज्या तरूणांनी लोकसभेत गोंधळ घातला, त्या तरूणांचा लोकसभेत घुसून गोंधळ घालण्यामागे काय उद्देश होता ? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या तरूणांचे दहशतवाद्यांशी कोणतेही कनेक्शन नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी या सरकारला जागे करण्यासाठी हे तरूण लोकसभेत घुसले होते का? असा प्रश्‍न निर्माण होते, मात्र त्याचे उत्तर या तरूणांकडून मिळणे अपेक्षित आहे. आरोपींनी संसदेत घुसण्याचा प्लॅन जवळपास दीड वर्ष आधीच तयार करण्यात आला होता. संशयित आरोपीपैकी 4 आरोपी वर्षभरापूर्वी फेसबुकवर एकमेकांना भेटले. त्यांनी भगतसिंग नावाचा ग्रुप देखील तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून ते एकामेकांच्या संपर्कात राहत होते. त्यांचे विचार एकमेकांशी जुळले होते. या प्रकरणात पाचवा आणि सहावा आरोपी देखील त्यांच्या प्लानमध्ये सहभागी झाला. तीन दिवसांपूर्वी आरोपी दिल्लीत दाखल झाले होते.

COMMENTS