Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिटी बसच्या इंजिन चा भीषण स्फोट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

https://www.youtube.com/watch?v=OA3yCWqIZro छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ येथून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वेरूळ येथील भोसले चौ

मुंबईच्या अंधेरी येथील टी-२ विमानतळ भूमिगत मेट्रो स्टेशनवर आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले
एसटी बस अपघातात 4 जणांचा मृत्यू; अहिल्यानगरच्या दिशेने येतांना माळशेज घाटात अपघात
दिल्लीत आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने केला विजेच्या तारांवरून थरारक प्रवास

छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ येथून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वेरूळ येथील भोसले चौक बसस्थानकात एका सिटी बसच्या इंजिनमध्ये अचानक भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर-वेरूळ मार्गावर धावणाऱ्या या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे ही बस भोसले चौक बसस्थानकात उभी करून तिची दुरुस्ती केली जात होती. मात्र, दुरुस्ती सुरू असतानाच अचानक इंजिनमध्ये मोठा आवाज झाला आणि इंजिनचा भीषण स्फोट झाला. काही क्षणांतच बसमधून दाट धूर बाहेर पडू लागला.

जर ही बस धावती असती किंवा बसमध्ये प्रवासी असते, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी या घटनेने शहर बसच्या देखभालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बसस्थानकावरील परिस्थिती नियंत्रणात असून, तांत्रिक बिघाडामुळेच हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

COMMENTS