Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; उपविभागीय अधिकारी आहेर यांचे आवाहन; बीएलओकडून माहिती संकलन

शिर्डी : मतदारसंघातील मतदार यादीचा आगामी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार असून या महत्त्वाच्या कामात नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी केले आहे.  शिर्डी मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर सध्या महत्त्वपूर्ण कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत २०२४ च्या मतदार यादीतील तसेच २००२ मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातील अंतिम मतदार यादीतील ‘कॉमन’ मतदारांची पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये रक्ताच्या नात्यातील वारसांची, म्हणजे मुलगा-मुलगी किंवा नातू-नात यांच्या तपशीलांची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त केलेल्या बीएलओमार्फत ही प्रक्रिया शीघ्रगतीने राबविली जात आहे.  मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर लग्न होऊन इतर गावांतून आलेल्या महिला मतदारांचा समावेश असतो. त्यांच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी संबंधित महिलांच्या वडील किंवा आई यांची २००२ च्या मतदार यादीतील नावे तसेच इतर आवश्यक माहिती प्रशासनाकडून मागविली जात आहे. या अनुषंगाने अनेक बीएलओ मतदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती घेत आहेत तसेच त्यांचे संपर्क क्रमांकही नोंदवत आहेत.  या प्रक्रियेबाबत नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता बीएलओना आवश्यक माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत होण्यास मदत होईल. त्यामुळे या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन  आहेर यांनी केले आहे.

मृत्यूशी झुंजणाऱ्या १५ वर्षे जुन्या वटवृक्षाचे श्रीगोंद्यात यशस्वी पुनर्रोपण; वृक्षप्रेमींचा स्तुत्य उपक्रम
केरळचे राज्यपाल राजेंद्रजी आर्लेकर यांची ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास भेट 
घर घर लंगर सेवेने साजरी केली रस्त्यावरील वंचितांची दिवाळी वंचितांना फराळचे वाटप

शिर्डी : मतदारसंघातील मतदार यादीचा आगामी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम लवकरच राबविण्यात येणार असून या महत्त्वाच्या कामात नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी केले आहे.

 शिर्डी मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर सध्या महत्त्वपूर्ण कार्यवाही सुरू आहे. याअंतर्गत २०२४ च्या मतदार यादीतील तसेच २००२ मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातील अंतिम मतदार यादीतील ‘कॉमन’ मतदारांची पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये रक्ताच्या नात्यातील वारसांची, म्हणजे मुलगा-मुलगी किंवा नातू-नात यांच्या तपशीलांची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त केलेल्या बीएलओमार्फत ही प्रक्रिया शीघ्रगतीने राबविली जात आहे.

 मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर लग्न होऊन इतर गावांतून आलेल्या महिला मतदारांचा समावेश असतो. त्यांच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी संबंधित महिलांच्या वडील किंवा आई यांची २००२ च्या मतदार यादीतील नावे तसेच इतर आवश्यक माहिती प्रशासनाकडून मागविली जात आहे. या अनुषंगाने अनेक बीएलओ मतदारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती घेत आहेत तसेच त्यांचे संपर्क क्रमांकही नोंदवत आहेत.

 या प्रक्रियेबाबत नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता बीएलओना आवश्यक माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत होण्यास मदत होईल. त्यामुळे या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन  आहेर यांनी केले आहे.

COMMENTS