Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

नाशिक:  - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न झाला.विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) डॉ. संज

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा;विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडविण्याचा संकल्प – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
दुर्गराज रायगडावर 5 व 6 जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळा; मोठ्या संख्येने उपस्थित राहा – गंगाधर काळकुटे पाटीलयुवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक उत्सव; हजारो शिवभक्त होणार सहभागी

नाशिक:  – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न झाला.विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते विद्यापीठ प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आहे. यावेळी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. मिलिंद निकुंभ आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याची संस्कृती व इतिहास वैभवशाली आहे. विद्यापीठात काम करतांना सर्वांनी समाजहिताच्या दृष्टीने योगदान द्यावे. शासनाच्या विविध योजना असून त्यात आपला सहभाग असणे अभिप्रेत आहे. सामाजिक आरोग्य व त्या अनुषंगिक बाबींवर काम करण्यासाठी आपण स्वयंसेवक म्हणून काम करणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या धोरणात सामाजिक समस्या सोडविण्यासाठी योग्य बाबींचा समावेश करुन उज्वल महाराष्ट्र घडविण्यात आपला सहभाग नोंदवू असे त्यांनी सांगितले.
  यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत व ‘जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS