Homeताज्या बातम्याक्रीडा

ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल लवकरच होणार बाबा

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि पत्नी विनी रमन यांच्या आयुष्यात एका गोंडस पाहुण्याचे आगमन होणार आहे. मॅक्सवेलची पत्नी वि

भारतीय क्रिकेट संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याची घोषणा
जयंत प्रिमियर कबड्डी लिग’च्या दुसर्‍या दिवशी जय हनुमान पतसंस्था टायगर्स हा संघ डॉर्क हॉर्स ठरला
गुंगीचे औषध घालून महाविद्यालयीन तरुणीवर कब्बडीपटूचा बलात्कार

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि पत्नी विनी रमन यांच्या आयुष्यात एका गोंडस पाहुण्याचे आगमन होणार आहे. मॅक्सवेलची पत्नी विनी रमन ही भारतीय वंशाची असून तिने बेबी शॉवर समारंभाची एक झलक शेअर केली आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे मॅक्सवेलच्या पत्नीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला. १८ मार्च २०२२ रोजी हे जोडपे विवाहबंधनात अडकले. २०१३ मध्ये मेलबर्न स्टार इव्हेंटमध्ये ग्लेन व विनी यांची पहिली भेट झाली.  बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२० मध्ये भारतीय पद्धतीनेच दोघांनी साखरपुडा केला. अँचोरमॅन 2@ क्राऊन येथे त्यांची पहिली डेट झाली. खरं तर भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. विनीने ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथील कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. २०१३ मध्ये मेलबर्न स्टार इव्हेंटमध्ये ग्लेन व विनी यांची पहिली भेट झाली. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२० मध्ये भारतीय पद्धतीनेच दोघांनी साखरपुडा केला होता

COMMENTS