Homeताज्या बातम्या

सिडकोकडून पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात

नवी मुंबई : सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) बारवी धरण आणि मजीप्राचे पाताळगंगा धरण यांद्वार

माणसं प्रेमाने जोडली तर घोडबाजाराराला जागा उरत नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचे खा. सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर
महागाईविरोधात शरद पवार गटाचे मुंबईत आंदोलन
सायन-पनवेल महामार्गावर मुसळधार पावसामुळे जलमय परिस्थिती; १२ तासांच्या संततधारेने नवी मुंबईत वाहनांच्या लांबच लांब रांगा!
CIDCO Decision of 10 Percent Water Cut From May 28 2026 | Water Cut :  सिडकोचा मोठा निर्णय, येत्या 28 मे पासून 10 टक्के पाणी कपात होणार

नवी मुंबई : सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) बारवी धरण आणि मजीप्राचे पाताळगंगा धरण यांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असून, तापमानवाढीमुळे जलाशयांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढत आहे. त्याचबरोबर धरणांतील उपयुक्त जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाळा अपेक्षेपेक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता विचारात घेता, उपलब्ध पाणीसाठा धरण भरेपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियंत्रित आणि काटेकोर वापर करणे आवश्यक झाले आहे. सदर सर्व स्रोतांतील उपलब्ध जलसाठा, प्राप्त होणारा दैनंदिन पाणी पुरवठा आणि स्थानिक पाणी वाटप यांमधे सिडको प्रशासनामार्फत नियमित आढावा घेऊन नियोजन करण्यात येत आहे.

सध्याच्या परिस्थितीचा सर्वांगीण विचार करून आणि आगामी काळातील संभाव्य पाणी टंचाई टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून सिडको क्षेत्रात गुरुवार, दि. २८ मे २०२६ पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेटवणे, मोरबे आणि इतर संबंधित जलस्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त जलसाठ्यात अपेक्षित वाढ होईपर्यंत सदर पाणी कपात लागू राहील. अशा प्रकारचा पाणी कपातीचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आपल्या क्षेत्राकरिता घेतला आहे.

COMMENTS