बाळासाहेब थोरात यांचा विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेब थोरात यांचा विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा

मुंबई/प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाला मोठे हादरे बसतांना दिसून येत आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँगे्रसचे चंद्रकांत हंडोर

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
कसबा निवडणुकीत आचारसहिंतेचा भंग
राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

मुंबई/प्रतिनिधी : विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाला मोठे हादरे बसतांना दिसून येत आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँगे्रसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाल्यानंतर काँगे्रस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
विधान परिषदेची निवडणूक झाली असून, त्यात काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाला. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विधान करत म्हटले की, या पराभवाची जबाबदारी मी घेतो काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभूत झाला आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 44 पैकी 41 मते मिळाली आहेत. म्हणजे काँग्रेसचे 3 मते फुटली आहेत. सोमवारी निवडणुकीचा कल हाती येताच बाळासाहेब थोरात यांनी पराभव पत्कारत आमच्या पक्षाची मते फुटली इतरांना काय दोष घ्यायचा असे म्हटले होते. त्यानंतर आता थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी विधान परिषदेचे निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमच्याच पक्षाची मतं जर फुटत असतील तर दुसर्‍यांना दोष देऊन काय फायदा? इतरांना दोष देण्याचा मुद्दाच नाही. आता आम्हाला विचार करण्याची गरज आहे. 2.5 वर्ष सत्तेत राहूनही जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमके कुठे का चुकते याचा विचार करण्याची गरज आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाचे तब्बल 13 आमदार नॉट रिचेबल आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. दुसर्‍या बाजूला काँग्रेसच्या गोटात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदार आज दिल्लीला जाणार आहेत. विधान परिषदेतील पराभवानंतर काँग्रेस नेते पक्ष नेतृत्त्वाची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाली आहेत. आता सरकार म्हणून आम्हाला विचार करावा लागेल, अशी भूमिका थोरात यांनी मांडली आहे.

बंडखोरीबद्दल आत्मचिंतन करणार : नाना पटोले
भाजप केंद्राच्या सत्तेचा, यंत्रणेचा गैरवापर करत आहे. सत्तेपासून पैसा आणि पैशांपासून पुन्हा सत्ता, असे भाजपाचे चक्र असून, असत्याचा मार्ग त्यांनी निवडला आहे. यामध्ये सत्याचा विजय होईल. ऊन आणि सावली जसे निसर्गाचा नियम आहे. महाराष्ट्रावर आलेल्या संकटाचे नक्कीच सावलीमध्ये रुपांतर होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, आज मुंबईत काँग्रेसची बैठक असून, त्यात काँग्रेसच्या सर्व आमदार हजर राहणार आहेत. दिवसा सत्तेचे स्वप्न पाहणार्‍या लोकांपासून बहुमताचा आकडा अजून लांब आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कुठलाही अडसा नाही, कालच्या विधान परिषद निवडणुकीत मतांची बंडखोरी झाली त्याचे आम्ही आत्मपरिक्षण करणार आहोत.

COMMENTS