Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय योजनांचा जत्रा कार्यक्रम घरोघर पोहचवा

शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांचे आवाहन

शिर्डी प्रतिनिधी ः शिवसेना शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या वतीने शासकीय योजनांची जत्रा या योजनेची सुरवात उत्तर महाराष्ट्रात शिर्डी येथुन करण्यात आली

पुरुषवाडी व वांजुळशेत शाळेची अव्वल कामगिरी
राहुरी लोकन्यायालयात 186 प्रकरणे तडजोडीअंती निकाली
अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी साधला आस्थेवाईकपणे संवाद

शिर्डी प्रतिनिधी ः शिवसेना शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या वतीने शासकीय योजनांची जत्रा या योजनेची सुरवात उत्तर महाराष्ट्रात शिर्डी येथुन करण्यात आली. शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमाचा मेळावा शिवसेना सचिव व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी व शिवसेना उपनेते यशवंत जाधव, खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या उपस्थितीत हॉटेल शांतिकमल, शिर्डी येथे पार पडला. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने प्रत्येक गावात शिवदूत योजना राबवण्यात येणार असून घरोघरी शासकीय योजनांची माहिती पोहचवण्यात येणार आहे. याप्रसंगी गजानन पाटील आणि अनिल घुगे यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. त्यानंतर विजय काळे, विठ्ठलराव घोरपडे यांनी संघटनात्मक बांधणी या विषयावर विचार मांडले. खा.सदाशिवराव लोखंडे यांनी विकासकामांची माहिती दिली. यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मार्गदर्शन केले तसेच उपनेते यांनी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य माणसांचे सरकार असून प्रत्येक गावागावात, घरोघरी सर्व शासकीय योजना पोहचवून संघटनात्मक बांधणी करू असे सांगितले. यावेळी मान्यवरांचा शाल,बुके आणि श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत आणि प्रास्तावीक जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी केले. आभार राजेंद्र देवकर यांनी मानले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार व बाजीराव दराडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे व कावेरीताई नवले, शिवसेना राहाता तालुका महिला आघाडी च्या वनिता जाधव, संघटक अनिता धनक, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जितेंद्र जाधव व महेश देशमुख तसेच सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी व युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

COMMENTS