Homeताज्या बातम्या

कुंभार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारआदर्श शिक्षक व नवनियुक्त पोलीस पाटलांचाही गौरव

अंबाजोगाई शहराजवळील शेपवाडी येथे कुंभार समाज, उद्योगपूर्ती निधी लिमिटेड, संत शिरोमणी गोरोबा काका सेवाभावी संस्था आणि गोरोबा काका प्रतिष्ठान यांच्

मणिपूर हिंसाचारानंतर मोठ्या कारवाईची तयारी
दीपक करगळ यांची 5 हजार किलो आंब्यांची साई प्रसालयात देणगी
शॉर्टसर्किटने ओमनी कार जळून खाक



अंबाजोगाई शहराजवळील शेपवाडी येथे कुंभार समाज, उद्योगपूर्ती निधी लिमिटेड, संत शिरोमणी गोरोबा काका सेवाभावी संस्था आणि गोरोबा काका प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास भागवत वैद्य (संस्थापक अध्यक्ष, लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तथा कोषाध्यक्ष, कुंभार समाज विकास समिती, बीड) आणि प्रा. तावरे (मराठी विभाग, खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. दत्ता कोंडीबा रामरुळे (जिल्हा उपाध्यक्ष, कुंभार समाज विकास समिती) होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून ह.भ.प. नारायण कोल्हापूरे (विश्वस्त, संत गोरोबा काका प्रतिष्ठान, शेपवाडी) यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. तावरे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र ओबीसी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या ’क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार-2026’ प्राप्त प्रा. डॉ. दत्ता कोंडीबा रामरुळे आणि सहशिक्षक दत्तात्रय रामभाऊ रेणापूरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मनीषा विठ्ठल परळकर (धावडी) आणि सचिन वैजनाथ तारळकर (सनगाव) यांची पोलीस पाटीलपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना भागवत वैद्य म्हणाले, कुंभार समाज संख्येने अत्यल्प असल्याने समाजाच्या विकासाकडे आणि समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि त्यांच्या छोट्या-मोठ्या यशाचाही गौरव करण्यासाठी अशा सत्कार समारंभांचे नियमित आयोजन होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेरणा निर्माण होऊन समाजाची भावी पिढी अधिक सक्षम बनेल. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा वारसा जपण्याचे आवाहन केले.

COMMENTS