बीड : माऊली मंगल कार्यालय येथे छत्रपती महाराज स्वाभिमान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची म

बीड : माऊली मंगल कार्यालय येथे छत्रपती महाराज स्वाभिमान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास बीडचे नायब तहसीलदार प्रशांत जाधव साहेब, मंडळ अधिकारी नायकवडे साहेब, आगाव मॅडम, कदम मॅडम तसेच ग्राम महसूल अधिकारी गरजे साहेब, नलावडे साहेब, कांबळे साहेब, इतापी साहेब आणि कृषी सहाय्यक मुळे साहेब, कृषी मंडळाधिकारी अंभोरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात शासनाच्या विविध योजना, कृषी विषयक मार्गदर्शन, महसूल विभागाच्या सेवा तसेच शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित अधिकार्यांनी नागरिकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी नेकनूरचे सरपंच सुंदर लांडगे, उपसरपंच सचिन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शिवा दादा तसेच दिव्य वार्ता चे प्रतिनिधी शेख शाकेर, बीड प्रसार प्रतिनिधी शेख सद्दाम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांचे आणि प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

COMMENTS