कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मंदीचे सावट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मंदीचे सावट

काही महिन्यांपूर्वी कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येण्याच्या दिशेने वाटचाल करत होती; मात्र आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकेवर काढल्याने मंदीचे सावट आहे.

सैराट फेम अभिनेत्याला मुजोर रिक्षाचालकाकडून शिवीगाळ.
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
दहा लाखांची मदत घेऊन सून पसार; सासू-सासरे वा-यावर l DAINIK LOKMNTHAN

नवी दिल्लीः काही महिन्यांपूर्वी कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येण्याच्या दिशेने वाटचाल करत होती; मात्र आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकेवर काढल्याने मंदीचे सावट आहे. भारताच्या विकास दरावर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा विपरीत परिणाम होईल, असा अंदाज गोल्डमन सॅश या वॉल स्ट्रीटच्या ब्रोकरेज कंपनीने वर्तवला आहे. 

2021-22 मध्ये भारताचा विकासदर 10.9 टक्के असेल, असा अंदाज गोल्डमन सॅशने या पूर्वी वर्तवला होता. आता मात्र सुधारित अंदाज संस्थेने जाहीर केला असून त्यानुसार 2021-22 मध्ये भारताचा विकासदर 10.5 टक्के असेल, असे संस्थेने म्हटले आहे. सध्या भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट अनेक राज्यांत दिसत असून, ठिकठिकाणी टाळेबंदी, संचारबंदी किंवा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम उद्योग-व्यवसायांवर होणे साहजिक आहे. या पार्श्‍वभूमीवर सुनील कौल यांच्या नेतृत्वाखाली गोल्डमन सॅशच्या अर्थतज्ज्ञांनी एक विस्तृत निवेदन जारी केले आहे. अनेक प्रमुख राज्यांनी कडक टाळेबंदी लागू केल्यामुळे आर्थिक स्थितीबद्दलची चिंता निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि उत्पन्नात सुधारणा होण्याबद्दल गुंतवणूकदारांना शंका आहे. 2021 मध्ये उत्पन्नात वाढ होण्याचा दर 27 टक्के असेल, असा अंदाज गोल्डमन सॅशने आधी वर्तवला होता. आता तो घटवून 24 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झाल्यावर तसेच निर्बंध शिथिल झाल्यानंतर साधारण जुलैपासून अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसू लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे शेअर बाजारातही संकटकाळ आला आहे. निफ्टीमध्ये सोमवारी (12 एप्रिल) 3.5 टक्क्यांनी नुकसान झाले. जून तिमाहीच्या विकासदरात घट होण्याचा अंदाज गोल्डमन सॅशने वर्तवला आहे; मात्र त्याचा आकडा दिलेला नाही. या सगळ्या गोष्टींचा एकंदर परिणाम कमी असेल. कारण निर्बंध सगळ्या क्षेत्रांवर लादण्यात आलेले नाही, असा दिलासाही या निवेदनात देण्यात आला आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने13 एप्रिल रोजी सांगितले, की भारतात आलेल्या कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमुळे विकासदराच्या 13.7 टक्के या अनुमानावर परिणाम होणार आहे. कारण एकंदर आर्थिक व्यवहारांवर सद्यस्थितीचा परिणाम होणार आहे. दुसरी लाट रोखण्यासाठी एप्रिल अखेरीपर्यंत योजण्यात आलेल्या उपायांचा आर्थिक वाढीवर परिणाम होईल; परंतु कोरोना रोखण्यासाठीचे उपाय आणि लसीकरणात वृद्धी झाल्यानंतर या परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

COMMENTS