Homeताज्या बातम्यासंपादकीय

शिदेंच्या शिवसेनेवर नामुष्की

राज्यातील राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ढवळून निघतांना दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेनेत उभी फू

समानतेच्या दिशेने…
अपघाताचे वाढते प्रमाण…
निर्यातबंदी आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न

राज्यातील राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ढवळून निघतांना दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात नेमके काय घडते, याची उत्सुकता राज्यातच नव्हे तर देशभरात दिसून येत आहे. दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच दोन्ही पक्ष लोकसभेच्या निवडणुकीला सामौरे जातांना दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या दरबारात पक्ष म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही गटांनी लढा जिंकला असला तरी, आता खरा निर्णय जनतेच्या दरबारात होणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे नेमका कुणाचा कस लागतो आणि कोण विजयी होतो, याची उत्सुकता असतांनाच शिंदे गटाचे पंख छाटण्याचे काम त्यांचाच मित्रपक्ष करतो आहे की काय? अशी शंका उपस्थित होत असतांना एकनाथ शिंदे मात्र गप्प राहतांना दिसून येत आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नेमके चालले आहे काय ? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

सर्वप्रथम शिंदेंनी आपल्या पक्षाचे आठ उमेदवार जाहीर केले. त्यात रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापण्यात आले, त्यांच्या जागी राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर हिंगोलीतून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर भाजपच्या वाढत्या विरोधानंतर त्यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. त्यातच भाजपने यवतमाळच्या पाच वेळ खासदार असलेल्या भावना गवळी यांचे तिकीट कापत हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकतर हेमंत पाटील यांचा यवतमाळ मतदारसंघात फारसा वावर राहिलेला नाही, शिवाय भावना गवळी त्यांना कितपत मदत करतील, अशी शंका असतांना कोणत्या निकषावर राजश्री पाटील निवडणून येतील, याचे सूत्र पक्षालाच माहिती. त्यानंतर नाशिकचे हेमंत गोडसे यांची उमेदवारी देखील धोक्यात असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळेच शिंदे यांची शिवसेना अजूनही उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करतांना दिसून येत नाही. यवतमाळची उमेदवारी आणि हिंगोलीची उमेदवारी ऐन मोक्याच्या क्षणी म्हणजे फॉर्म भरण्यास काही तासांचा अवधी असतांना जाहीर केली. त्यामुळे पक्षाने हेमंत पाटील आणि भावना गवळी पक्षांतर करणार नाही, आणि बंडखोरी करणार नाही, याची काळजी घेतली. असे असले तरी, शिंदे सेनेचे नाराज खासदार त्या त्या मतदारसंघात आपल्याच पक्षाचे काम  करतील कशावरून असादेखील प्रश्‍न आता उपस्थित होतांना दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव ज्या ठाण्यातून खासदार आहेत, त्याच मतदारसंघात त्यांच्या नावाची उमेदवारीची घोषणा अजूनही झालेली नाही. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या मतदारसंघातून येतात, जो जिल्हा शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो, त्याच ठाणे मतदारसंघावर भाजपने दावा केल्याचे समोर येत आहे. त्यासाठी भाजपने विविध सर्वेक्षणाचा हवाला दिला आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासमोर मोठे राजकीय संकट उभे राहतांना दिसून येत आहे. हेमंत पाटील, कृपाल तुमाने, भावना गवळी यांच्या जागा वाचवता आलेल्या नाहीत, मात्र चिंरजीव अर्थात डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे आणि गजानन कीर्तिकर यांच्या जागेवर देखील पाणी सोडण्याची नामुष्की शिंदे यांच्यावर येतांना दिसून येत आहे. शिवाय आता शिंदे आपलाच मित्रपक्ष भाजपविरोधात उघड भूमिका घेऊ शकत नाही, कारण पुन्हा ठाकरे गटात परतण्याचे परतीचे दोर केव्हाच कापण्यात आले आहे. तेव्हा इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच परिस्थिती शिंदे गटाची झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांचे ‘होम ग्राउंड’ समजल्या जाणार्‍या ठाण्यातही भाजपने कुरघोडीचे राजकारण सुरू केल्याने शिंदेसेनेत भाजपविषयी असलेली अस्वस्थता आता अविश्‍वासात व्यक्त होऊ लागली आहे. ठाणे आणि कल्याण या दोन मतदारसंघांसाठी मुख्यमंत्री आग्रही असणार ही काळ्या दगडावरची रेघ मानली जात होती. असे असताना या दोघांपैकी एक विशेषत: ठाण्यावर दावा सांगत भाजपने मुख्यमंत्र्यांच्या राजकारणाचे जे मूळ मानले जाते त्यावर घाव घातल्याची आता चर्चा आहे. त्यातर उत्तर मुंबईमध्ये गजानन कीर्तिकर यांनी आपल्या मुलाविरोधात निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळे ही जागा देखील शिंदे यांच्या शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आलेले 13 खासदार शिंदे यांच्यासोबत एकनिष्ठ राहतील कशावरून असा प्रश्‍न देखील यानिमित्ताने उपस्थित होतांना दिसून येत आहे. 

COMMENTS