Homeताज्या बातम्यादेश

झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन

रांची ः झारखंडच्या मुख्यमंत्री पदी मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन विराजमान झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

गदारोळात हरवले शेतकर्‍यांचे प्रश्‍न
खदानीच्या पाण्यात दुर्दैवी घटना
फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी विश्‍वजितराजे नाईक-निंबाळकर; उपसभापतीपदी संजय सोडमिसे बिनविरोध

रांची ः झारखंडच्या मुख्यमंत्री पदी मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन विराजमान झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमोर हा शपथविधी पार पडला. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी त्यांना 10 दिवसांचा कालावधी दिला.
चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्च्याचे वरिष्ठ नेते आणि उपाध्यक्ष आहेत. चंपाई सोरेन हे सरायकेला मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने निवडून आलेत. त्यांच्याकडे आदिवासी कल्याण विभागाचा कार्यभार आहे. हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातही चंपाई सोरेन यांचा सामावेश होता. त्यांच्याकडे वाहतूक विभागाची जबाबदारी होती. तर याआधी अर्जुन मुंडा सरकारच्या कार्यकाळातही त्यांनी मंत्रिपद भूषवले आहे. चंपाई सोरेन हे झारखंडच्या राजकारणातील वरिष्ठ नेते शिबू सोरेन यांच्या जवळचे मानले जातात. चंपाई हे झारखंडमध्ये ’टायगर’ नावानेही ओळखले जातात. हेमंत सोरेन यांनी 31 जानेवारी रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरच हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंपाई सोरेन हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील अशी चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

COMMENTS