Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 3 लाचखोरांना सीबीआयकडून अटक

नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपूर जिल्ह्यातील कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील नोकर भरती प्रकरणी सफाई कर्मचार्‍यासह तिघांना 2

कांद्याचा दर झाला दुप्पट , आणखी दर वाढण्याची शक्यता 
सिगारेटच्या वादातून मतिमंद व्यक्तीची हत्या | LOK News 24
संभुआप्पा-बुवाफन यात्रेतील बाजार शाळा नंबर 1 समोरील मैदानावर भरणार : विक्रमभाऊ पाटील यांची माहिती

नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपूर जिल्ह्यातील कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील नोकर भरती प्रकरणी सफाई कर्मचार्‍यासह तिघांना 2 लाखांची लाच घेताना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सफाई कर्मचारी दीप रमेश सकतेल, माळी या पदासाठी निवडलेले उमेदवार चंद्रशेखर कुवरलाल चिधलोरे आणि कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड, शाळेतील नर्सरी शिक्षिका शीतल रामटेके यांचा समावेश आहे. यांना 21 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये रमेश सकतेलसह कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कृष्णाजी लांजेवार यांच्यासह केसीबीच्या एका अज्ञात अधिकार्‍याचेही नाव होते. यातील माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर लांजेवार या सगळ्यांना सोबत घेऊन नोकर भरतीसंबंधीचे रॅकेट चालवित असल्याचा गुन्हा दाखल झाला होता. हे सर्व जण मोठ्या लाचेच्या बदल्यात सहाय्यक शिक्षक, माळी व सफाई कर्मचारी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांशी संपर्क साधत होते. व त्यांना नोकरी देण्याचे आश्‍वासन देत होते. सहाय्यक शिक्षक पदासाठी कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या यादीत नाव असलेल्या पात्र उमेदवारांशी संपर्क साधण्यासाठी केसीबीचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर लांजेवार नियमितपणे सफाई कर्मचार्‍यांशी संपर्क साधत असल्याचा आरोप करण्यात आला होता. एका प्रकरणात माळी पदासाठी निवड झालेल्या एका उमेदवाराशी सफाई कर्मचारी दीप रमेश सकतेल याने संपर्क साधीत त्याला निवडीचे आश्‍वासन दिले. केसीबीमध्ये माळी या पदावर निवड झाल्यानंतर उमेदवाराला सुरुवातीला 50 हजार रूपये देण्यास सांगितले. त्या नंतर उर्वरित पेमेंटबाबत चर्चा केली आणि 11.50 लाख रुपये देण्याचे मान्य केले. सीबीआयने सापळा रचून सफाई कर्मचार्‍याला एकूण लाचेपैकी पहिला हप्ता म्हणून 2 लाख रूपये घेताना रंगेहाथ पकडले.  तपासादरम्यान, केसीबी स्कूल, नागपूरमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणारी नर्सरी शिक्षिका शीतल रामटेके हीचीही भूमिका उघडकीस आल्याने तिलाही पकडण्यात आले. आरोपी आणि इतरांच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली. त्यात कागदपत्रे जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.

COMMENTS