Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांद्याचा दर झाला दुप्पट , आणखी दर वाढण्याची शक्यता 

  नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. आधीचा दर हा 10 ते 12 रुपये होते मात्र तेच दर 20 ते 25 रुपयां

Beed : माजलगाव धरण ओव्ह्यरफ्लो (Video)
तुळसण येथे बिबट्या दुचाकीच्या आडवा : चालक जखमी
फलटणमध्ये उसाच्या रसासह बायोसिरप आधारीत इथेनॉल प्रकल्प होणार

  नवी मुंबई प्रतिनिधी– नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. आधीचा दर हा 10 ते 12 रुपये होते मात्र तेच दर 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. अवकाळी पावसामुळे नवीन पीक खराब झाल्याने नवीन  कांदा बाजारात येऊ शकला नाही, त्यात जूने कांदे हे जवळपास संपले आहेत, त्यामुळे याचा थेट परिणाम कांद्याच्या दरांवर झाला असून, त्यात नवीन पीक यायला अजून एक ते दीड महिना जाऊ शकतो त्यामुळे दर अजून वाढण्याची शक्यता व्यापारी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आधीच महागाईची झळ पोहचली असताना कांदा अजून रडवताना दिसत आहे. त्यात बाजारात नवीन पीक येईपर्यंत अजून किती दर वाढतात हे पाहणे ही महत्वाचे आहेत.

COMMENTS