Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री अंबाबाई मंदिरात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

कोल्हापूर ःकोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या दानपेटी शेजारीच खाजगी पुजारी बेकायदेशी

रस्ते की पार्किंग? नांदेडची वाहतूक कोंडीत गुदमरली; कोचिंग क्लासेस, बेशिस्त पार्किंग आणि निष्क्रिय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भोकरात उत्साहात ध्वजारोहण; नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन
मानसिक आजारातून मुक्त मातेस 6 वर्षांनी आठवली मुलगी अन् घर

कोल्हापूर ःकोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या दानपेटी शेजारीच खाजगी पुजारी बेकायदेशीर दानपेटी (दानपात्र) लावत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने सोमवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या परिसरात दान पत्र लावण्यात येणार आहे. या दानपात्रात जमा होणारी रक्कम ही गोरगरीब जनतेसाठी खर्च करण्यात येणार आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेडने दिली. आज अंबाबाई मंदिर परिसरात दानपत्र आंदोलन करण्यात येत आहे. महाद्वार परिसरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

COMMENTS