Homeताज्या बातम्यादेश

भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचा ः केंद्रीय मंत्री शहा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात 2047 मध्ये आपण व्यसनमुक्त भारत निर्माण करू. येणार्‍या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसन

अमरावतीत रवी राणा विरोधात बच्चू कडू आपली भूमिका मांडणार
नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसित करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लाच घेतांना बारामतीतील पोलिस हवालदार गजाआड

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात 2047 मध्ये आपण व्यसनमुक्त भारत निर्माण करू. येणार्‍या पिढ्या आणि देशाच्या भविष्यासाठी व्यसनमुक्त भारत अतिशय महत्वाचे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. आज आपण व्यसनाविरुद्धच्या युद्धात अशा ठिकाणी आहोत की इथून दृढसंकल्प, सामूहिक प्रयत्न, एकसंघता आणि संपूर्ण सरकार हा दृष्टीकोन घेऊन पुढे गेलो तर आपला विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली येथे आयोजित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमलीपदार्थ विरोधी कृती दलाच्या प्रमुखांच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते. अंमली पदार्थांची अवैध शेती शोधून काढण्यासाठी एक मोबाइल प सुरु करण्यात आले आहे, अंमलीपदार्थ विरोधी विभागाचा वार्षिक अहवाल प्रकाशित झाला आहे आणि या सोबतच इंदोर प्रादेशिक कार्यालयाचे देखील उद्घाटन झाले आहे. असे त्यांनी सांगितले. ही सर्व पावले अमलीपदार्थांच्या विरोधात आपल्या  लढाईला बळ देणारी सिद्ध होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. अंमलीपदार्थांचे व्यसन देशाच्या तरुण पिढीचे नुकसान  तर करत आहेतच,  त्या सोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील वाईट परिणाम करत आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसोबतच अंमलीपदार्थ दहशतवाद देशाच्या सीमा आणि तिथली सुरक्षा खिळखिळी करत आहे. यावर मात करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय  गृह मंत्रालयाने एक रणनीती तयार केली आहे ज्यात तीन महत्वाचे मुद्दे आहेत – संस्थात्मक व्यवस्था मजबूत करणे, सर्व अंमलीपदार्थ विरोधी संस्थांमध्ये समन्वय स्थापन करणे आणि व्यापक जनजागृती अभियान चालवणे. शाह म्हणाले की, एकसंघ भावना आणि संपूर्ण सरकार हा दृष्टीकोन ठेवून आपण पुढे गेले पाहिजे. ते म्हणाले की ही लढाई पक्षीय राजकारण आणि राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन लढावी लागेल.

COMMENTS