Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांची प्रचंड गर्दी! प. बंगालमधील ‘त्या’ धोरणानंतर परिस्थिती तणावपूर्ण?

कोलकाता : भारत आणि बांगलादेश सीमेवर सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या एका विशेष मोहिमेमुळे सीमेवरील अन

मराठा आरक्षणावर समाधानकारक काम सुरू; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा
श्रीगोंद्यात दुर्दैवी; शेतात ट्रॅक्टर घेऊन गेलेल्या २२ वर्षीय तरुण इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा वीज कोसळून मृत्यू
विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करावा; प्राचार्य यशवंत भोसले यांचे आवाहन
Rethinking India's Border Strategy to Curb Illegal Migration

कोलकाता : भारत आणि बांगलादेश सीमेवर सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या एका विशेष मोहिमेमुळे सीमेवरील अनेक भागांत संशयास्पद आणि बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांचे मोठे गट एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे सीमावर्ती भागात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.

पश्चिम बंगालमध्ये नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘पहचानो, हटाओ और वापस भेजो’ (ओळखा, बाजूला करा आणि परत पाठवा) या कडक धोरणामुळे घुसखोरांचे धाबे दणाणले आहेत. उत्तर २४ परगणा आणि मालदा जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून जी दृश्ये समोर येत आहेत, ती पाहता या भागात मोठी हालचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत केवळ राजकीय भाषणांमध्ये ऐकायला मिळणारी घुसखोरविरोधी मोहीम, आता थेट प्रशासकीय कारवाईच्या रूपात जमिनीवर उतरताना दिसत आहे.

या कडक प्रशासकीय कारवाईमुळे सीमेवर सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. घुसखोरी पूर्णपणे रोखण्यासाठी आणि संशयितांना परत पाठवण्यासाठी सीमा सुरक्षा बल (BSF) आणि स्थानिक पोलीस प्रशासनाकडून संयुक्त मोहीम राबवली जात आहे. आगामी काळात या मोहिमेचे पश्चिम बंगालच्या राजकारणावर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय पडसाद उमटतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS