Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कायद्याच्या अंतिम वर्षाच्या अखेरच्या सत्रातील एक पेपर रद्द; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय ; विद्यार्थ्यांना दुसर्‍यांदा द्यावी लागणार परिक्षा

सातारा / प्रतिनिधी : पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण या विभागातील विद्यार्थ्यांना पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा पुरविणारे शिवाजी विद्यापीठ कोल्हापू

शेंदूरजणे येथे जिलेटीनच्या 1600 कांड्या जप्त
थापा मारणारा विचित्र बघितला नाही : आ. नाईक-निंबाळकर
बेकायदेशीररित्या बस चालविल्याबद्दल आ. जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा

सातारा / प्रतिनिधी : पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण या विभागातील विद्यार्थ्यांना पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा पुरविणारे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गेल्या काही दिवसापासून चर्चेचा विषय बनू लागले आहेत. दुष्काळी परिस्थितीत लोक रानो-माळी भटकंती करू लागले तरीही शिवाजी विद्यापिठाच्या परिक्षा तसेच परिक्षांचे निकाल वेळेवर लागले असल्याच्या इतिहासाला काळीमा फासण्याचे काम गेल्या काही दिवसापासून होवू लागले आहे. त्याचाच एक प्रत्यक कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना आला आहे. मार्च-एप्रिल महिन्यात होणार्‍या परिक्षा पुढे-पुढे ढकलून त्या जुलै महिन्याच्या अखेरीस घेतल्या होत्या. त्यातील दि. 26 जुलै रोजी झालेला इंटेलेक्च्यअल प्रापर्टी लॉ या विषयाचा पेपर विद्यापीठाने रद्दबातल ठरविला असल्याचा निर्णय दि. 23 रोजी विद्यापीठाने जाहीर केला. या प्रकाराने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देण्याचा एकही मार्ग विद्यापीठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे.
गेल्या सहा महिन्यापासून कायद्याच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हतबल झाले होते. त्यातच ऑनलाईन अद्यापन सुरु होते. त्यानंतर एसटी कर्मचार्‍यांचा संप मात्र महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे बंधन घालत ऑनलाईनचे वर्ग बंद करून ऑफलाईन तासिका होवू लागल्या. कोरोनामुळे समाज व्यवस्था विस्कळीत असताना हे नवीन संकट आले होते. त्यातच परिक्षा ऑफलाईन की ऑनलाईन याबाबतचा निर्णय मंत्र्यांनी घोषित करण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र, कायद्याचे विद्यार्थी हतबल झाल्याचे पहावयाच मिळाले. विद्यापीठ निर्णय देईना, मंत्री निर्णय घेईना. नुसत्याच अक्कल शुन्य लोकांकडून घोषणांचा पाऊस पाडण्याचे काम सुरु होते. अखेरीस परिक्षा ऑफलाईन घेण्यावर ठाम झाले. मग सुरु झाले ते बहुपर्यायी परिक्षा की वर्णनात्मक लेखी पध्दतीने परिक्षा होणार याचा वाद सुरु झाला. त्यानंतर अखेर लेखी-बहुपर्यायी परिक्षा असा काही दिवसाचा वादंग वाढवला. अखेर ऑफलाईन बहुपर्यायी परिक्षा घेण्यावर ठाम निर्णय झाला.
परिक्षा घेण्यावरून सुरु असलेल्या रामायणाचा शेवट होतो ना होतो तोच परिक्षेच्या पहिल्या पेपरमधील तीन प्रश्‍नांमध्ये चुका निदर्शनास आल्या. तर दुसरा पेपर बरा झाला. मात्र तिसरा पेपर इंटेलेक्च्यअल प्रापर्टी लॉ या विषयाचा होता. छेपर सेटींग करणार्‍या व्यक्तीने असा पेपर सेट केला होता की, भले-भले आपण यंदा वकील होऊ हेच विसरुन गेले. अखेरच्या पेपरमध्येही असाच दोन प्रश्‍नांमध्ये गोंधळ उडवून दिला होता. अंतिम सत्रासाठी चारच पेपर सेट करावयाचे होते. मात्र, यातून विद्यार्थ्याला 50 टक्के गुण मिळणार नाहीत, याचे पुरेपुर नियोजन करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी अनुभवल्यानंतर पुन्हा आंदोलने सुरु झाली. या आंदोलनातून वकील होताना विद्यार्थ्यांना किती वेदना दिल्या. याचा प्रत्यय म्हणून विद्यापिठाचे उपकुलसचिव यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी 26 जुलै रोजी झालेला इंटेलेक्च्यअल प्रापर्टी लॉ या विषयाचा पेपर रद्दबातल ठरवला. संबंधित विषयाचा पेपर 29 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर परिक्षा नियंत्रण मंडळ व पेपर सेटींग करणार्‍या कमिटीच्या नाकात बुक्की मारल्याचे पहावयास मिळाले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात असा कधीही प्रकार घडला नव्हता. परिक्षा कशी घ्यावी यासाठी विद्यार्थी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. म्हणून सरसकट विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याच्या मानसिकतेच्या लोकांना चपराक देण्याचे काम परिक्षा उपकुलसचिवांनी दिलेल्या आदेशाने झाले आहे.

COMMENTS