Homeताज्या बातम्या

च्या कर्णकर्णशः सायलेंसर जिल्हा वाहतूक शाखेचा लगाम

बीड - पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या सुचनेवरुन तसेच जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी वैभव पाटील आणि सहाय्यक प

पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार; महापालिकेकडून १२ ‘मिसिंग लिंक’ रस्ते प्रकल्पांना गती
अवैध प्रकारांची तक्रार केल्याचा राग?; वनपरिक्षेत्राधिकार्‍यांनी धमकी दिल्याचा भाजप पदाधिकार्‍यांचा आरोप
भ्रष्टाचारमुक्त पार्टीचे देशव्यापी जनआंदोलन ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत भ्रष्टाचाराविरोधात एल्गार

बीड – पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या सुचनेवरुन तसेच जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी वैभव पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.9 ऑगस्ट 2026 रोजी बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स येथे 17.00 ते 19.00 वाजण्याच्या दरम्यान कर्णकर्णश आवाजाच्या नागरिकांना त्रास होत असलेल्या 13 बुलेट चालकांच्या वाहनावर सायलेन्स जप्त करुन कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस हवालदार अजिनाथ मुंडे, त्रिंबक कुडके, गणेश तळेकर, पोलीस नाईक सचिन सारणीकर, पोलीस अंमलदार संतोष मोरे, वसीम शेख, संजय टुले, तसेच शिवाजीनगर पो.स्टे.चे ग्रेड पीएसआय मच्छिंद्र राख, लिंबाजी महानोर, बीड शहरचे पोलीस अंमलदार सचिन वाघमारे, संतोष तांबे जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार अनिकेत घुले, पोलीस चालक दत्ता कदम इत्यादींनी सहभाग नोंदविला. आपल्या बुलेट वाहनाला मोडीफाय सायलेन्सर बसवून शहरात ठोऽऽऽ ठो ऽऽऽ आवाज करुन नागरिकांना वेठीस धरणार्या वाहनधारकांनी यापुढे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करु नये असा इशारा जिल्हा वाहतुक शाखेने यावेळी दिला आहे. यापुढे कोणीही बुलेट सायलेन्सर मोडीफाय करुन नागरिकांना त्रास होईल असे वाहन रस्त्यावर चालवणार नाही तसेच ध्वनीप्रदुषण करणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा साउंड पोल्युशन कायद्यानुसार आणि इनव्हायरमेंट प्रोटेक्शन अ‍ॅक्ट कायदा 1986 प्रमाणे गुन्हे नोंद करून वाहन विनापरवाना मॉडीफाय केल्याबाबत जबर दंड वसूल करण्यात येईल. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळावे असे आवाहन जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी वैभव पाटील यांनी केले आहे.

COMMENTS