Homeताज्या बातम्यासंपादकीय

भक्ताडाला हौस असेल, तर, होऊन जाऊ द्या चौकशी, भुजबळांची अन् आमचीही ! 

 'चहा पेक्षा किटली गरम', ही पूर्वापार चालत आलेली म्हण आहे; त्यात थोडा बदल करून आम्हाला असे म्हणावेसे वाटते की, नेत्यापेक्षा भक्ताला भ्रम!&nb

सॅम पित्रोदा आणि विवाद ! 
संविधान आणि कामगार!
नोटबंदीच्या याचिका निकालात ! 

 ‘चहा पेक्षा किटली गरम’, ही पूर्वापार चालत आलेली म्हण आहे; त्यात थोडा बदल करून आम्हाला असे म्हणावेसे वाटते की, नेत्यापेक्षा भक्ताला भ्रम! 

    ‌काल आमच्या दखल सदरात घेतलेला विषय एकाला भलताच झोंबला. ज्यांना झोंबत ते काही दखलपात्र नसतात. ते चमचा बनून कुणाच्या तरी तोंडाला लागून चर्चेत येऊ इच्छितात. अशा रिकामटेकड्यांची साधी दखलही आम्ही आयुष्यात कधी घेतली नाही. आमचा लढा नेहमीच ओबीसी आणि बहुजन समाजाच्या हक्कासाठी राहीला आहे. उपटसुंभांना तिथे स्थान नाही. असो. 

     तर, आमचा विषय होता ओबीसी म्हणवून घेत ओबीसींवरच अन्याय करणाऱ्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वात शिर्षस्थानी असणारे नेते म्हणजे छगन भुजबळ हेच आहेत, अशी आमची पक्की खात्री झालीय.   एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या जातीतील सर्व किंवा बहुतांश मतांची बिदागी आपल्याकडे खेचण्याच्या षडयंत्राला ‘सोशल इंजिनियरिंग’ म्हणतात, एवढं आम्हाला ठाऊक आहे. पण, सोशल इंजिनिअरिंग एखाद्या प्रवर्गाच्या समुळ अधिकाराचे उच्चाटन करण्यासाठी वापरले जाईल, याची आम्हाला जराही कल्पना नव्हती. छगन भुजबळ यांच्या माध्यमातून ही संकल्पना सध्याच्या निवडणुकीत पुढे आल्याचे आमचे मत बनले आहे. भारतीय समाजव्यवस्थेत कोणत्याही सामाजिक भ्रष्टाचाराला थारा नाही. कारण, सामाजिक भ्रष्टाचार हा आपल्याच रक्ताच्या किंवा समदुःखी परिवारजनांचा विध्वंस करणारा असतो. महाराष्ट्रात समग्र ओबीसी आपल्या सामाजिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी एकजूट झाला असताना, त्यांच्या त्या एकजुटीचा वापर त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या शक्तींनाच मजबूत करण्यासाठी होत असेल तर, असे षडयंत्र उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसू शकत नाही.  गेले पाव शतक आम्ही हातात लेखणी घेऊन यासाठी सरसावलो आहेत. छगन भुजबळ हे आमचे वैयक्तिक शत्रू नाहीत; किंबहुना, त्यांच्याशी वैयक्तिक विरोध घेण्याची आम्हाला हौस नाही. परंतु, ज्या ज्या वेळी ओबीसींच्या सामुहिक हितावर कुऱ्हाड पाडली जाईल, त्या त्या वेळी आम्ही तसे करणाऱ्यांच्या विरोधात तुटून पडू! मग, समोर कोण आहे, याची आम्ही जराही तमा बाळगणार नाही. छगन भुजबळ हे स्वतःची ओळख ओबीसी नेते अशी करून देत असतील, तर, आमचा त्यांना जाहीर सवाल आहे की, त्यांनी ओबीसींच्या हितासाठी नेमके काय केले, याची जंत्री दाखवावी. याऊलट, आम्ही ज्यांना वरच्या जातीचे ठरवतो, त्यांनी ओबीसींना आज जे काही राजकारणात स्थान मिळवून दिले, त्याचे श्रेय त्यांना आहे. यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अग्रणी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसींचे स्थान बळकट करून ‘रूलिंग कास्ट’ असणाऱ्या मराठा समुदायाला त्यांनी बॅकफूटवर ढकलले आहे. ओबीसी समुदायाच्या अनेक छोट्या-मोठ्या मागण्या मा. देवेंद्र फडणवीस यांनी केवळ मान्यच केल्या असे नव्हे, तर, प्रत्यक्षात त्या मागण्यांसाठी आवश्यक कार्यवाही करून प्रत्यक्षात ती कामे केली. आमचा वैयक्तिक अनुभव हे सांगतो की, तेर येथील संत गोरोबा यांच्या स्मारकासाठी जागेची मागणी करताच मा. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व औपचारिक बाबींची पूर्तता करून संत गोरोबा स्मारकाला जागा आणि निधी मंजूर केला. अर्थात, हा आमचा वैयक्तिक अनुभव असला तरी, समग्र ओबीसी समुदायासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जंत्रीही आमच्याकडे आहे; परंतु, केवळ लेखात जागाव्याप्तीच्या कारणास्तव ते आम्ही इथे नमूद करू इच्छित नाही.

       आमची भूमिका एवढीच आहे की, ज्या ज्या वेळी ओबीसी आपल्या हक्कासाठी जागा झाला, त्या त्या वेळी म्हणजे गेल्या तीस वर्षांत छगन भुजबळ यांनी ओबीसी या नावाचा वापर केला. परंतु, प्रत्यक्षात ओबीसींच्या पदरी निराशाच आली. सामाजिक हितासाठी राबण्याची प्रेरणा किंवा जाणीव असणारे नेते, वैयक्तिक मालमत्तेचा ढिगारा वाढविण्यासाठी आकंठ भ्रष्टाचारात बुडालेले नसतात. छगन भुजबळ यांच्या याच कमजोरीवर आम्ही नुसते बोट ठेवले तर, एक भक्ताड आम्हाला आव्हान देण्याची भाषा करतो! आम्ही अशा आव्हानांना कधीही भीक घातली नाही; आम्ही सतत ओबीसींच्या हितासाठी मैदानात राहिलो आहोत. ज्या भुजबळ भक्तांना वाटत असेल की, आम्ही वाम मार्गाने पैसा उभा करून ओबीसी जागृती घडविणारे प्रसार माध्यम चालवतो, त्यांना आमचे आव्हान आहे की, भुजबळांच्या संपत्तीची ईडी, सीबीआय चौकशी होऊ द्या आणि आमचीही होऊ द्या! आम्ही असल्या दळभद्री प्रकारांना कधी घाबरत नाही. कारण, आमचं कार्य हे पदराचं घालून समाजकार्य करण्याचं आहे. याची ग्वाही आम्ही नव्हे, तर, महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव देतील. त्यामुळे, जो कोणी भुजबळ भक्ताड आम्हाला आव्हान देतो, त्याला आमचे हे प्रति आव्हान आहे!

COMMENTS