Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट जागीच ठार; वनरक्षक महेश मेटे यांना कळविले-डॉ. गणेश ढवळे

लिंबागणेश : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-डी वर बुधवारी (दि.11) दुपारी सुमारे सव्वा दोन वाजण

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये बीड जिल्ह्यातील 779 प्रकरणे निकाली
बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा; कर्णकर्कश सायलेन्सरवर आष्टी पोलिसांची धडक कारवाई
आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश; सिरसाळा येथील घरकुल धारकांचे थकीत हप्ते खात्यावर जमा!

लिंबागणेश : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-डी वर बुधवारी (दि.11) दुपारी सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत एक काळवीट गंभीर जखमी झाले.
मुळुकवाडी येथील सुखदेव वाणी व ग्रामस्थांनी जखमी काळवीटाला पाणी पाजून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र गंभीर दुखापत झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. काळवीट मृत्यूमुखी पडल्याची माहिती त्यांनी फोनद्वारे वनरक्षक महेश मेटे यांना दिली तसेच वनकर्मचारी तातडीने पाठविण्याची विनंती केली. राष्ट्रीय महामार्ग 548-डी वर हरिण व काळवीट अज्ञात वाहनांच्या धडकेत जखमी होण्याच्या किंवा मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या महिन्यातही याच मुळुकवाडी शिवारात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरिणाला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले होते. मात्र यावेळी काळवीटाचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सावधानतेचे फलक लावावेत व वाहनचालकांना वेग मर्यादा पाळण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे.

COMMENTS