नवी दिल्ली: गुजरातमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पूरग्रस्त भागांतून ४०,५०० हून अधि

नवी दिल्ली: गुजरातमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पूरग्रस्त भागांतून ४०,५०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून अहमदाबादमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रे आज बंद ठेवण्यात आली आहेत.
दुसरीकडे, आसाममध्येही पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला असून, या मोसमातील पुरामुळे बळींचा एकूण आकडा ६१ वर पोहोचला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील तब्बल ७.०५ लाखांहून अधिक नागरिक या पुरामुळे बाधित झाले असून आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मदत व बचावकार्य वेगाने राबवले जात आहे.

COMMENTS