Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दादा चौधरी मराठी शाळेत धमाल उन्हाळी छंद वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न

अहमदनगर- विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतून न ठेवता आनंददायी शिक्षण द्यावे.सततच्या अभ्यासाने मुलांवर अभ्यासाचा ताण येतो.मुलांना वेगवेगळ्या खेळण्या

कामगारावरील अन्याय दूर करा अन्यथा आंदोलन ः हर्षदा काकडे
Sangamner : संगमनेरमध्ये मुसळधार पाऊस| LokNews24
अहमदनगरच्या राहता तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात

अहमदनगर– विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतून न ठेवता आनंददायी शिक्षण द्यावे.सततच्या अभ्यासाने मुलांवर अभ्यासाचा ताण येतो.मुलांना वेगवेगळ्या खेळण्यातून, कृतीतून शिक्षण द्यावे.उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो.दादा चौधरी मराठी शाळेत चांगल्या प्रकारे धमाल छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मुलांना भरपूर फायदा झाला आहे. या शिबिरात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते.तसेच डिसेंबर महिन्यातही अशा प्रकारे शिबिर घ्यावे.अशी मागणी विद्यार्थ्यांनी करावी.असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे कार्यकारणी सदस्या प्रा.ज्योतीताई कुलकर्णी यांनी केले आहे. हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी मराठी शाळेत तीन वर्ष ते दहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी धमाल उन्हाळी छंद वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवातीला महाराष्ट्र बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना गिरी व विश्रामबाग शाळेच्या बालवाडी विभागाच्या पर्यवेक्षिका वर्षा चिखले यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली.याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत हिंद सेवा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक अजित बोरा,कार्यकारणी सदस्य प्रा.ज्योतीताई कुलकर्णी,दादा चौधरी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.नंदा कानिटकर,मेहेर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रा.अनुरीता झगडे ,दिलीप परसपाटकी आदि उपस्थित होते.

  अजित बोरा म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी शिबिराच्या माध्यमातून अत्यंत चांगले शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांचे मनोरंजन,खेळ,तसेच व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी प्रेरणादायी चित्रपट हंबीरराव मोहिते दाखविण्यात आला आहे. या शिबिरात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. धमाल छंद वर्गात अकरा दिवसात शिकवलेल्या उपक्रमापैकी नृत्य सादरीकरण दोन गटात करण्यात आले.अनुष्का चंगेडिया या विद्यार्थिनीने भरतनाट्यम नृत्य सादर केले. कु‌.आर्या उपरे,रचना कनोरे,सारंगा कुलकर्णी,गौरव बेद्रे,शेळके या विद्यार्थ्यांनी मनोगत सादर केली.प्रास्ताविक सुभाष येवले म्हणाले, शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.दर शनिवारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम राबविला जातो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रुपाली वाळुंजकर यांनी केले.तर आभार दिलीप परसपाटकी यांनी मानले.या शिबिर यशस्वीतेसाठी शाळेतील मंगल पवार,गणगले मॅडम, वाकचौरे मॅडम,देवराव मॅडम, प्रिया अहिरे,रुचिता मॅडम,वैशाली डफळ आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. फोटो कॅप्शन-हिंदसेवा मंडळाच्या दादा चौधरी मराठी शाळेत धमाल छंद वर्गात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

COMMENTS