Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय स्थनिक स्वराज्य संस्था, नाशिक येथे झालेल्या  रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

नाशिक प्रतिनिधी - अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक केंद्रामार्फत जीवन सोनवणे,विभागीय संचालक,यांचे मार्गदर्शन खाली रक्तदान शिबिराचे आ

संत निरंकारी मिशनच्या वतीने आज रक्तदान शिबीर
म.ज्यो.फुले महाविद्यालयात रक्तदान शिबीर
केज तालुक्यातील येवता येथे राजमाताअहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त जय मल्हार मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.

नाशिक प्रतिनिधी – अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक केंद्रामार्फत जीवन सोनवणे,विभागीय संचालक,यांचे मार्गदर्शन खाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र त्र्ंबके, जिवशास्त्रज्ञ, मनपा,नाशिक यांचे शुभहस्ते शानदार पद्धतीने करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी श्रीमती हीना  शेख,Counseling PRO,समता रक्त पेढी ,डॉ. दिलीप मेनकर, उपसंचालक, फायर कोर्स चे प्रशिक्षक अभिजित बनकर  तसेच अखिल भारतिय स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व कर्मचारी  व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. 

 या कार्यक्रम प्रसंगी डॉ. दिलीप मेनकर, उपसंचालक  यांनी संस्थेच्या कार्याविषयी    माहिती दिली व  पाहुण्यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा  परिचय करुन  देऊन त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. 

डॉ. राजेंद्र त्र्यंबके  यांनी मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना सर्व विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले व विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहीत केले. समता रक्तपेढी च्या  श्रीमती हीना शेख यांनी अधिक माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनातून रक्तदानाविषयी असलेले गैरसमज व भिती दूर केली. यानंतर प्रमुख पाहुणे डॉ राजेंद्र त्र्ंबके , उपसंचालक डॉ. दिलीप मेनकर यांनी स्वत: रक्तदान करुन विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहीत  केले.एकुण 35 विद्यार्थ्यांनी रक्तदान करुन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदानानंतर  विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित  करण्यात आले.अखेरीस रक्तदानाला संस्थेकडून भरघोस  प्रतिसाद मिळाल्याबद्द्ल आणि रक्तदान शिबिर आयोजित करत असल्याने संस्थेला सुवर्ण प्रमाणपत्र, देऊन सन्मानित करण्यात आले. अक्षदा आहेर यांनी आभार मानले व शिबिराचा समारोप झाला.

COMMENTS