Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाविकास आघाडीतील वितंडवाद

महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष दाखल झाले असून, त्यातील ठाकरे गट तर विभन्न विचारांचा आणि कडव्या हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. म

आगीच्या वाढत्या दुर्घटना
आश्‍वासनांची खैरात
शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड

महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष दाखल झाले असून, त्यातील ठाकरे गट तर विभन्न विचारांचा आणि कडव्या हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. मात्र अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये ठाकरे गटाचे हिंदुत्व आता सॉफ्ट झाल्याचे दिसून येत आहे. मुळातच दोन भिन्न विचारधारा घेऊन एकत्र आलेले तीन पक्षाचे किती जमेल हा यक्षप्रश्‍न होता. मात्र तिन्ही पक्षांनी चांगलेच जुळवून घेतले तरी, महाविकास आघाडी प्रथम एकत्रितरित्या लोकसभा निवडणुकांना सामौरे जातांना दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पक्षातील वितंडवाद दिसून येत आहे. सांगलीच्या जागेवरून काँगे्रस आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत आहे. मुळातःच काँगे्रस हा राष्ट्रीय पक्ष असून देखील या पक्षाने राज्यात दुय्यमत्वाची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. खरंतर ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्यांच्या पक्षातील 41 आमदार आणि 13 खासदार पक्ष सोडून गेल्यानंतर ठाकरे यांच्या गटाची ताकद कमी झाल्यानंतरही त्यांना सर्वाधिक जागा देण्यास काँगे्रसने कुचराई केल्याचे दिसून येत आहे. काँगे्रसची ताकद असतांना देखील हा पक्ष आत्मविश्‍वास गमावून बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जागावाटपामध्ये देखील या पक्षाने आक्रमक भूमिका न घेता ज्या मिळेल त्या जागा घेण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेचा वाद निर्माण होतांना दिसून येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत 17 लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्यातील 16 वेळेस सांगली मतदारसंघातून काँगे्रसचा खासदार निवडून आलेला आहे. असे असतांना देखील ही जागा ठाकरे गटाला जाणे म्हणजे सांगली काँगे्रसमधील कार्यकर्त्यांच्या भावनांना ठेच पोचल्याचे दिसून येत आहे. यातून काँगे्रसच्या हायकमांडने देखील हातवर केल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाला पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये चंचूप्रवेश करण्याची संधी सांगलीच्या जागेवरून मिळतांना दिसून येत आहे. जर सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार निवडून आला तर, पश्‍चिम महाराष्ट्रात ठाकरे यांच्या शिवसेनेला हातपाय पसरता येईल, त्यामुळे ठाकरे गट याजागेसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे विशाल पाटील आणि विश्‍वजीत पाटील यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे विशाल पाटील यांनी आपण या जागेवरून निवडणूक लढणार असल्याचे सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. शिवाय सांगली जागेतील तिढा सोेडवण्याची मागणी काँगे्रसने राजधानीतील हायकमांडकडे केली आहे. त्यामुळे हायकमांड यासंदर्भातील निर्णय उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी घेणार असल्याचे समजते. त्यामुळे काँगे्रसपुढे ठाकरे गटाला उमेदवारी मागे घेण्याची मागणी करावी लागणार आहे. मात्र ठाकरे गट या मागणीला अनुकूल भूमिका घेण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून मिठाचा खडा पडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सांगलीमध्ये जर ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आला तर, ठाकरे गटाला सांगली, बेळगाव आणि कारवारपर्यंत आपल्या पक्षाचा व्याप वाढवण्याची नामी संधी मिळणार आहे, त्यामुळेच राऊत आणि ठाकरे ही जागा प्रतिष्ठेची करतांना दिसून येत आहे. मात्र सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांच्या पक्षाची कोणतीही हवा नाही, किंवा कोणताही मतदारसंघाची बांधणी दिसून येत नाही. तसेच या मतदारसंघात काँगे्रसचे प्राबल्य राहिलेले दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आयता मतदारसंघ आणि सूपीक जमीन काँगे्रस उपलब्ध करून देत असल्याचे दिसून येत आहे. 16 वेळा खासदार निवडून आलेला मतदारसंघावर काँगे्रस जर पाणी सोडत असेल तर, खरंच काँगे्रसने आपला आत्मविश्‍वास गमावला असेच म्हणावे लागेल. 

COMMENTS