Homeताज्या बातम्या

गरजूंच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणार-डॉ. श्रावणी वेदपाठक

जे का रंजले गांजले... या संतवचनांची प्रेरणा घेत गरजू, वयोवृद्ध आणि निराधार व्यक्तींना मदत करणे, त्यांच्या हाकेला धावून जाणे आणि आरोग्यसेवा उपलब्ध

सार्वजनिक आरोग्य हिताचा स्तुत्य उपक्रमकेशव नागरगोजे यांच्या उपस्थितीत आयुष्मान आरोग्य मंदिरात पोलिओ लसीकरण व आरोग्य सुविधांची पाहणी
योगामुळे आत्मिक उन्नती होते : गोसावी
किनवट न्यायालयात 20 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर



जे का रंजले गांजले… या संतवचनांची प्रेरणा घेत गरजू, वयोवृद्ध आणि निराधार व्यक्तींना मदत करणे, त्यांच्या हाकेला धावून जाणे आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हेच आपल्या आयुष्याचे ध्येय असल्याचे प्रतिपादन डॉ. श्रावणी वेदपाठक यांनी केले.
आदित्य डेंटल कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानिमित्त डॉ. श्रावणी वेदपाठक यांनी बीड येथील जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला भेट देत तेथील लाभार्थ्यांना फळांचे वाटप केले व त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांत जिव्हाळा केंद्रातील अनेक गरजूंच्या दातांच्या समस्या सोडविण्याचे काम केले असून अनेकांचे किडलेले दात मोफत काढून दिले. पुढील काळातही अधिकाधिक गरजू रुग्णांना दंतआरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपल्या वैद्यकीय शिक्षणात आदित्य डेंटल कॉलेजच्या संचालिका श्रीमती आदिती सारडा तसेच सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, चार वर्षांच्या शैक्षणिक प्रवासात प्रात्यक्षिकांसाठी जिव्हाळा केंद्रातील लाभार्थ्यांचे मोठे सहकार्य लाभल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. श्रावणी वेदपाठक यांनी केंद्राला भेट दिली. यावेळी जिव्हाळा बेघर निवारा केंद्राच्या कर्मचार्‍यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

COMMENTS