बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांची जयंती उत्साहात साजरी कर

बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अशोक कदम यांच्या हस्ते स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सखाराम कानतोडे यांनी विद्यार्थ्यांना स्व. अजित पवार यांच्या कार्याचा परिचय करून देत त्यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्यांची उपस्थिती होती. तसेच प्राचार्य अशोक कदम यांचाही वाढदिवस असल्याने उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता तोगे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुकुंद आबुज यांनी मानले.

COMMENTS