नांदेड : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कंधार-लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संक
नांदेड : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कंधार-लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संकल्पनेतून माळाकोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी (23 जुलै) मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्रणिता देवरे-चिखलीकर यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची डोळ्यांची तपासणी, सिकल सेल चाचणी, रक्तातील साखर (शुगर) तपासणी, रक्तदाब मोजणी आदी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले. यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सावली देणार्या विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रणिता देवरे-चिखलीकर म्हणाल्या, पर्यावरणाचा र्हास मानवामुळेच झाला असून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारीही मानवाचीच आहे. प्रत्येकाने किमान सात झाडे लावून त्यांचे संगोपन केल्यास भविष्यात पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मोठी मदत होईल. कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश कांबळे, डॉ. अनुपसिंग, डॉ. दीपाली काळे, डॉ. प्रकाश नागरगोजे, डॉ. शिंगारे, डॉ. शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रमुनी मस्के, माजी उपसभापती रोहित पाटील, माजी सरपंच हनुमंत धुळगुंडे, खेडकर सरपंच, रामदास पाटील, भीमराव नाईक, बाळू बाबर, परमेश्वर मुरकुटे, गणपत अण्णा तिडके, हणमंत लांडगे, तुकाराम पवार यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा सेविका, रुग्णवाहिका चालक अतिश कांबळे, शिबिराचा लाभ घेणारे रुग्ण व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच चंद्रमुनी मस्के यांनी केले

COMMENTS