किनवट : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय, निमशासकीय आणि जिल्हा परिषद कर्मचारी तसेच सेवानिवृत्तांना 1 जानेवारी 2026 पासूनचा 2 टक्के वाढीव महा

किनवट : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय, निमशासकीय आणि जिल्हा परिषद कर्मचारी तसेच सेवानिवृत्तांना 1 जानेवारी 2026 पासूनचा 2 टक्के वाढीव महागाई भत्ता मागील 6 महिन्यांच्या थकबाकीसह तात्काळ अदा करावा, या मागणीसाठी शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी तालुका समन्वय समिती (किनवट-माहूर) यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच एक आग्रही निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्यांना जानेवारी 2026 पासूनचा वाढीव महागाई भत्ता वितरित करून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, राज्य सरकारने अद्यापही या संदर्भातील मंजुरी न दिल्यामुळे कर्मचार्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. 6 महिन्यांपासून प्रलंबित असलेला हा हक्क तात्काळ मान्य करून चालू महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा, अशी जोरदार मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी समन्वय समिती, जिल्हा नांदेड च्या वतीने सादर करण्यात आले असून, प्रशासनाने यावर तत्परतेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS