Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडेच

कृषीखाते मुंडे, भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खाते

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होवून तब्बल 13 दिवसांचा कालावधी उलटला तरी, खातेवाटप झालेली नव्हती, अखेर शुक्रवारी खातेवाटप करण्यात

अजित पवारांच्या अडचणीत वाढ; राज्य बँक घोटाळ्याची ’पीएमएलए’ कोर्टाकडून दखल
कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनातातील वाढीसाठी प्रस्ताव तयार करा
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होवून तब्बल 13 दिवसांचा कालावधी उलटला तरी, खातेवाटप झालेली नव्हती, अखेर शुक्रवारी खातेवाटप करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आले आहे. अजित पवारांना अर्थमंत्रीपद नको, यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदांरानी विरोध केला होता, मात्र अजित पवार, प्रफुल्ल पटेल अणि हसन मुश्रीफ यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून, अर्थमंत्री देण्याची मागणी केली होती, तसेच शिंदे गटाची समजूत काढण्याची विनंती केली होती, अखेर अजितदादांना अर्थमंत्रिपद देण्यात आले आहे.
दिलीप वळसे पाटील यांना महत्त्वाचे मानले जाणारे सहकार खाते देण्यात आलेले आहे. दुसरीकडे मराठवाड्याच्या अब्दुल सत्तार याच्याकडे असलेले कृषी खाते काढून घेऊन ते फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर आदिती तटकरे यांना अपेक्षेप्रमाणे महिला आणि बालकल्याण खाते मिळालेले आहे. अजित पवारांसह नऊ मंत्र्यांचा समावेश सरकारमध्ये झाला असला, तरी या विस्ताराला दोन आठवडे उलटूनही नव्या मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नव्हते. महत्त्वाच्या खात्यांसह पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्ष सुरू होता. पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात तर उघड संघर्ष होता. त्यामुळे खातेवाटपाला विलंब होत होता. मात्र एकनाथ शिंदे-अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्या मॅरेथॉन बैठकांनंतर खातेवाटपाचा तिढा सुटला.

कोणाला कोणते खाते ?
अर्थ व नियोजन- अजित पवार
सहकार- दिलीप वळसे पाटील
कृषी- धनंजय मुंडे
अन्न व नागरी- छगन भुजबळ
महिला व बालविकास- आदिती तटकरे
क्रीडा- संजय बनसोडे
मदत व पुनर्वसन- अनिल पाटील
अन्न व औषध प्रशासन- धर्मरावबाबा अत्राम
वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ

कुणाची खाती काढून कुठली खाती दिली? – अब्दुल सत्तार-कृषी खाते काढून-अल्पसंख्याक विकास
संजय राठोड-अन्न आणि औषध प्रशासन काढून मृदा आणि जलसंधारण
अतुल सावे- सहकार खाते काढून-ओबीसी कल्याण

COMMENTS