श्रीगोंदा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) जिल्हा सहसंयोजकपदी सिव्हिल इंजिनिअर यश जितीन काळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष माधव बनसुडे यांच्या हस्ते पेढा भरवून व शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला.यावेळी माधव बनसुड यांनी यश काळे यांचे अभिनंदन करत, विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून समाजहिताची कामे करताना विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून संघटनेचे नाव उंचावावे, तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावे, अशा शुभेच्छा दिल्या.या सत्कार प्रसंगी कालिका स्टीलचे सर्वेसर्वा अरविंदजी कासार, माजी नगरसेवक दत्तात्रय हिरणावळे, प्रगतशील शेतकरी मारुती डाके, समीर पांढरकर, प्रतिक घाटे तसेच आदित्य अनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनीही यश काळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक, शैक्षणिक व युवकांच्या प्रश्नांवरही उपस्थितांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. नवीन जबाबदारीमुळे विद्यार्थी संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

COMMENTS