Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

अर्धापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती अर्धापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आल

खा. अशोकराव चव्हाण व आ.श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा परिषदेत घेतली आढावा बैठक
अर्धापूरजवळ भरधाव कारचा कहर; आखाड्यात घुसून शेतमजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू
तुटणारे संसार जोडणारे अर्धापूर केंद्र; 1 हजार 778 प्रकरणांत यशस्वी समेट
भीमराव आम्बेडकर - विकिपीडिया

अर्धापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती अर्धापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजाच्या ध्वजारोहणाने झाली. लोकप्रिय नगरसेवक सोनाजी सरोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर समता सैनिक दलाने पंचशील ध्वजाला मानवंदना दिली.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रज्ञा बौद्ध विहारात मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रविण देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. राम वाघमारे आणि आकाशवाणीचे निवेदक मिलिंद व्यवहारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख, उपनगराध्यक्ष मुक्तादेरखान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णूकांत क-हाळे व चित्तरंजन ढेमके, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, नगरसेवक राजू शेटे, बाबुराव लंगडे, व्यंकटराव राऊत, मुसबीर खतिब, विराज देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल वानखेडे, माजी उपसरपंच सुनील देशमुख वाळकीकर, कार्याध्यक्ष बालासाहेब देशमुख, संचालक व्यंकटराव साखरे, अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सखाराम क्षीरसागर, अध्यक्ष गुणवंत विरकर, डॉ. विशाल लंगडे, युवानेते अभिषेक गुरखेल, प्रवक्ते सुभाष लोणे, शहराध्यक्ष योगेश हाळदे, बाळू माटे, अजामो जिल्हाध्यक्ष विलास साबळे, गोपाल पंडित, माजी नगराध्यक्ष प्रणिता सरोदे, वंचितचे दीपक मगर, शिवहार घोडेकर व शेख जुबेर आदींचा समावेश होता. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार पुस्तके व ग्रंथ भेट देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्धापूर तालुका सार्वजनिक भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष उमाकांत सरोदे यांनी केले. त्यांनी जयंतीनिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष भिमराव सरोदे (पेंटर) यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास सरोदे यांनी मानले.

COMMENTS