Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘बिग बॉस 16’ विजेता एमसी स्टॅनचा लाइव्ह शो बंद पाडला

मुंबई प्रतिनिधी - बिग बॉस १६' चा विजेता एमसी स्टॅनशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. इंदूरमधील त्याचा लाइव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचे

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग’ प्रकरणात दिलासा
धक्कदायक…एकाच घरातील तिघांनी विष घेऊन केली आत्महत्या (Video)
अखेर निवडक औषधांवरील आयात शुल्क रद्द

मुंबई प्रतिनिधी – बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅनशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. इंदूरमधील त्याचा लाइव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर बजरंग दलाने रॅपरला मारहाण करत धमकावल्याचा आरोप आहे. ही बातमी समोर आल्यानंतर एमसी स्टेनचे चाहते प्रचंड संतापले आहेत. रॅपरच्या समर्थनात, ट्विटरवर पब्लिक स्टँड्स विथ एमसी स्टॅन हा ट्रेंड सुरू झाला आहे. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. ‘बिग बॉस १६’ चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन देशातील विविध शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करत आहे. इंदूरमध्ये त्याचा शो होता. दरम्यान, बजरंग दलाच्या लोकांनी एकच गोंधळ घातला. खरं तर, बजरंग दल आधीपासूनच एमसी स्टॅनच्या गाण्यांमधील शिवीगाळ आणि महिलांला चुकीच्या पद्धतीने दाखवण्याच्या विरोधात आहे. याशिवाय एमसी स्टॅन आपल्या गाण्यांमध्ये ड्रग्जला प्रोत्साहन देतो, ज्यामुळे तरुणाई वाया जाते असा आरोपही बजरंग दलाने केला आहे.

COMMENTS