आमदार लहामटेच्या पुढाकाराने सुसज्ज ॲक्सिजन प्लॅन्ट व कोविड सेंटर -जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार लहामटेच्या पुढाकाराने सुसज्ज ॲक्सिजन प्लॅन्ट व कोविड सेंटर -जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील

अकोले प्रतिनिधी  भगवान पवार आमदार डॅा. लहामटेच्या पुढाकाराने अतिशय सुसज्ज ॲक्सिजन प्लॅन्ट व कोविड सेंटर अकोलेकरांसाठी  उभे राहीले असुन यातुन

वानखेडेंच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही – जयंत पाटील (Video)
जयंत पाटलांची सत्ता गेली आहे , पण माज अजून गेला नाही
सरकार गेलेले सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर; पडळकरांची टीका

अकोले प्रतिनिधी  भगवान पवार

आमदार डॅा. लहामटेच्या पुढाकाराने अतिशय सुसज्ज ॲक्सिजन प्लॅन्ट व कोविड सेंटर अकोलेकरांसाठी  उभे राहीले असुन यातुन निश्चितच चांगल्या आरोग्याच्या सुविधा अकोले करांना मिळतील अशी भावना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  ना.जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

ग्रामीण रुग्णालय अकोले येथील ॲक्सिजन निर्मिती प्रकल्प व विस्तारीत ओविड इमारतीचा उदघाटन व लोकार्पण सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांचे हस्ते संपन्न झाला यावेळी अकोलेचे लोकप्रतिनिधी आमदार डॅा.किरण लहामटे,जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष सीताराम पा.गायकर,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे,तहसीलदार सतिष थेटे,जिल्हा बॅकेचे युवा संचालक अमित भांगरे,जिल्हा परिषद सदस्या साै.सुनिताताई भांगरे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुरेश खांडगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे,तालुका महिलाध्यक्षा साै.संगिताताई शेणकर,वैद्यकीय अधिक्षक डॅा.संजय घोगरे, ग्रामीण रुग्णालय अकोले,सा.बा.कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील,कडाळी साहेब, वैद्यकिय अधिकारी  डॅा.बाळासाहेब मेहेत्रे,डॅा.सुनिल साळुंके,उद्योजक सुरेश गडाख,राष्ट्रवादीचे संदिप शेणकर,बबन वाळुंज,सह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जलसंपदा मंत्री ना.पाटील यांनी ॲक्सिजन प्लॅन्ट व विस्तारित कोविड सेंटरचे फित कापून उद्घाटन केलेनंतर  विस्तारित कोविड सेंटरची पाहणी करत असताना ते म्हणाले कि अतिशय सुसज्ज असे कोविड सेंटर उभारले असुन यातुन निश्चितच अकोलेकरांची कोविड संक्रमणात आरोग्याची काळजी घेतली जाईल .अकोले करांना आमदार डॅा.किरण लहामटेच्या प्रयत्नाने चांगल्या आरोग्याची सुविधा उपलब्ध होत असल्याची भावना व्यक्त केली.

याप्रसंगी अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वतिने वैद्यकिय अधिक्षक डॅा.संजय घोगरे,वैद्यकीय अधिकारी डॅा.बाळासाहेब मेहेत्रे, डॅा.सुनिल साळुंके यांनी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, आमदार डॅा.किरण लहामटे,जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष सीताराम पा गायकर,माजी.जी.प.अध्यक्ष अशोकराव भांगरे,अमित भांगरे,साै.सुनिताताई भांगरे,प्रा सुरेश खांडगे,साै.स्वाती शेणकर,यांचा सत्कार करण्यात आला सुत्रसंचलन डॅा.संदिप कडलग यांनी केले.

COMMENTS