Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक राहणार बंद

ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमची कामं सुरळीत करू शकता

जर तुमची अशी काही कामं असतील किंवा काही कामं रखडली असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही कामाचं नियोजन करा. डिसेंबर महिन्यात 13 दिवस

‘नोरा फतेही’चा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाली पछताओगे…
केंद्राची परवानगी; राज्याची आडकाठी ; ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय होत नसल्याने उद्योजक नाराज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एवढे घाबरतात का? | LokNews24

जर तुमची अशी काही कामं असतील किंवा काही कामं रखडली असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही कामाचं नियोजन करा. डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक बंद असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या डिसेंबर 2022 च्या बँक हॉलिडे लिस्टनुसार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांसह महिन्यातील सुमारे अर्धे दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. अशा परिस्थितीत ही यादी तपासून घराबाहेर पडणे योग्य ठरेल. डिसेंबर महिन्याच्या बँक हॉलिडे कॅलेंडरवर नजर टाकल्यास 3, 12, 19, 24, 26, 29, 30, 31 रोजी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल, तर 4, 10 रविवार साप्ताहिक आहेत. डिसेंबरचा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता 11, 24, 25 रोजी सुटी असेल. तथापि, बँकांच्या शाखा बंद असल्या तरी, ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमची कामं सुरळीत करू शकता. ही सुविधा नेहमीच 24 तास कार्यरत राहील.

COMMENTS