Homeताज्या बातम्या

वसंतदादा पाटील महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाटोदा | येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सा

‘आमदारसाहेब, या मुजोर अधिकार्‍याचे डोकं ठिकाणावर आणा!’ तीन अपत्यांचा देखावा करून आशा सेविकेचा बळी घेणार्‍या तालुका आरोग्य अधिकार्‍याविरुद्ध संतापाचा उद्रेक
ढगाळ वातावरणामुळे पिकात गवत; तणनाशक फवारणी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी
मृग नक्षत्र कोरडे; बीड जिल्ह्यात शेतकरी हवालदिल! कापूस, सोयाबीन पिकांवर पावसाअभावी संकट

पाटोदा | येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी लेखन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम राख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. बळीराम राख, उपप्राचार्य प्रा. डॉ. अभय क्षीरसागर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिल जोगदंड, पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रा. डॉ. गणेश पाचकोरे, पर्यवेक्षक प्रा. दयानंद सरपते, कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत पवार तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सोमनाथ लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकात प्रा. डॉ. सोमनाथ लांडगे यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. प्रा. डॉ. प्रज्ञा महेशमाळकर यांनी आपल्या मनोगतात दोन्ही महान व्यक्तींच्या साहित्यिक, सामाजिक व राजकीय योगदानावर प्रकाश टाकला. लेखन प्रेरणा दिनानिमित्त मराठी विभागप्रमुख प्रा. राजाभाऊ धायगुडे यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मराठी शुद्धलेखन व लेखन नियमांबाबत मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बळीराम राख यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या विचारांचा तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. अण्णाभाऊ साठे यांनी दलित, श्रमिक व वंचित घटकांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियात सादर करून त्यांची कीर्ती जगभर पोहोचवली, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. सोमनाथ लांडगे यांनी केले, तर डॉ. चंद्रशेखर बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहाय्यक कार्यक्रमाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS