Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेबांच्या शिवसेनेला खंबीर सेनापती मिळाले – देवेंद्र लांबे

राहुरीत बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरी शहर तथा तालुक्यात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात

LokNews24 l फोन टॅपिंगच्या माध्यमातून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव
तुम्हाला दिव्यांग मुले होतील…इंदुरीकर महाराजांनी दिला शाप
जिल्ह्यातील 67 हजार दूध उत्पादक शेतकर्‍यांना 61 कोटींचे अनुदान

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरी शहर तथा तालुक्यात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.  येथिल संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे विद्यार्थांना फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला. राहुरी येथे संत व्यापारी संकुलन येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयाचे उदघाटन उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, खा.लोखंडे यांचे स्वीयसहाय्यक शिवाजी दिशागत यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब म्हसे, जयवंतराव पवार, अध्यात्मिक आघाडीचे जि.प्र.ह.भ.प.संपत जाधव, राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, शेतकरी आ.प्र.किशोर मोरे, ता.संघटक अशोक तनपुरे, शहर प्रमुख गंगाधर सांगळे, अविनाश क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी लाईफ ईन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक धनंजय पानसंबळ व ग्रामीण रुग्णालय राहुरी यांच्या सहयोगाने सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले.विशेष म्हणजे या दरम्यान विविध प्रकारच्या रक्त तपासणी मोफत करण्यात आल्या. या शिबिरात डोळे तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळून आल्याचे दिसून आले.आरोग्य शिबिरात बि.पी, शुगर तपासणी, डोके दुखी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, त्वचेचे आजार, पोटाचे विकार, मणक्याचे आजार, गुडघे दुखी, कंबर दुखी, सांधेवात अशा अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या. शेकडो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. या प्रसंगी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.राहुरी पोष्ट ऑफिस यांच्या वतीने अपघात विमा उतरविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. संत गाडगेबाबा आश्रम शाळा वरवंडी येथिल विद्यार्थांना आध्यत्मिक आघाडी जि.प्रमुख ह.भ.प. संपत जाधव यांच्या वतीने भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी उत्तर नगर जिल्हा प्रमुख बोलतांना म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर नगर जिल्ह्यामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन प्रत्येक तालुक्यात करण्यात आले. राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी कमी वेळात तालुक्यात मोठे नियोजन केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेनेची ताकद वाढणार आहे असे चित्र दिसत आहे असे देवकर म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजक आभार मांडतांना राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे पा.म्हणाले की, दोन दिवस अगोदर वरिष्ठांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबविण्याच्या सूचना बैठकीत दिल्या होत्या. त्या आदेशानुसार राहुरी तालुक्यात कमी वेळात जास्त उपक्रम राबविण्यात आलेले आहे. सेनापती निडर व लढवय्या असल्यास सैन्य देखील निधड्या छातीने लढत असतात. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला निडर सेनापती मिळाले आहेत. त्यामुळे नवे जुने शिवसैनिक एकत्र येत भगव वादळ निर्माण होत आहे असे देवेंद्र लांबे म्हणले. या कार्यक्रमास दक्षिण जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी भेट देवून कार्यक्रमास शुभेच्छ्या दिल्या. या रक्तदान संदीप गिते, अशोक तनपुरे, विक्रम गाढे, प्रभाकर तुपे, दीपक माळी, चंद्रशेखर वाडकर, राजेंद्र लबडे, बाप्पुसाहेब वाडकर, सागर जावळे, शरद गावडे, अशोक गावडे, तात्या येवले, बाळासाहेब पवार, विकास साळवे, राजेंद्र परदेशी, राजेंद्र अढगले, विशाल मकासरे, राजेंद्र मिर्झा, राजेंद्र भागवत, विलास साळवे आदी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

COMMENTS