Homeताज्या बातम्या

ट्विंकलिंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये रंगला आषाढी एकादशीचा बाल दिंडी सोहळाटाळ-मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय; विठ्ठल-रुक्मिणीसह संतांच्या वेशातील बालगोपाळांनी वेधले लक्ष

बीड : आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, भक्ती

‘याचि देही याचि डोळा’… ! ६१ उपदिंड्या, ६० हजारांहून अधिक वारकरी निवृत्तीनाथ महाराज पालखीचे देवळाली प्रवरात भक्तिभावाने स्वागत
आषाढी वारीसाठी 5,500 विशेष बसगाड्यांची व्यवस्थामंत्री सरनाईक यांची माहिती ; विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरी सज्ज
सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचा दिंडी सोहळा उत्साहात


बीड : आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, भक्तीभाव व सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशाने ट्विंकलिंग स्टार इंग्लिश स्कूल, शिवाजीनगर शाखेच्या वतीने बुधवार, दि. 28 जुलै 2026 रोजी भव्य बाल दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा आणि भगवे झेंडे घेतलेले चिमुकले वारकरी विठ्ठल… विठ्ठल… च्या अखंड गजरात दिंडीत सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. दिंडी मार्गावर नागरिकांनी बालवारकर्‍यांचे तसेच शाळेच्या शिस्तबद्ध आयोजनाचे मनापासून कौतुक केले. या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन श्री. गणेश मैड सर तसेच डॉ. केदार मॅडम (जिल्हा रुग्णालय, बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विधीवत पालखी पूजन व श्रीफळ वाढवून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेचे महत्त्व सांगत भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. प्ले-ग्रुप ते इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेच्या प्रमुख अश्विनी वळे मॅडम यांच्यासह शिक्षिका स्वाती महाकुंडे, आशा धापसे, स्नेहल माने, मनीषा डापकर आणि दीपिका कदम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुचिता देवगुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपिका कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करून भक्तिमय वातावरणात सोहळ्याची सांगता करण्यात आली.
संतांच्या रूपातील बालगोपाळांनी वेधले लक्ष
या बाल दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेली भगवान विठ्ठल, माता रुक्मिणी आणि वारकरी संतांची वेशभूषा होय. नरेंद्र काचगुंडे याने भगवान विठ्ठल, श्लोका लकडे हिने माता रुक्मिणी, अद्विक येडशीकर याने संत तुकाराम, तर सई कोटुळे हिने संत मुक्ताबाई यांची भूमिका अत्यंत सुंदरपणे साकारून उपस्थितांची मने जिंकली. संतांच्या वेशातील या बालगोपाळांनी दिंडीला भक्तीमय आणि संस्कारमय स्वरूप प्राप्त करून दिले.

COMMENTS