Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी सात हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणे : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ या ठिकाणी 1 तारखेला शोर्य दिवस साजरा केला जाणार आहे. दोन वर्षानंतर हा सोहळा निर्बंधमुक्त साजरा केला जाणार आहे

नवी मुंबईत एक कोटींचे अमली पदार्थ जप्त
नामदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाची होणार रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट

पुणे : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ या ठिकाणी 1 तारखेला शोर्य दिवस साजरा केला जाणार आहे. दोन वर्षानंतर हा सोहळा निर्बंधमुक्त साजरा केला जाणार आहे. यामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

 या ठिकाणी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तब्बल 7 हजार पोलिसांच बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या सोबतच या ठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. कोरेगाव भीमा येथे ब्रिटिशकालीन विजयस्तंभ बांधण्यात आला आहे. या ठिकाणी दरवर्षी भीम अनुयायी येत मानवंदना वाहत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधामुळे या सोहल्यावर मर्यादा आल्या होत्या. मात्र, या वर्षी निर्बंधमुक्त सोहळा साजरा होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. या वर्षी तब्बल 10 ते 12 लाख नागरिक मानवंदना देण्यासाठी येणार आहे. या वर्षी पुणे नगर मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी तब्बल 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

COMMENTS