Homeताज्या बातम्यादेश

आपचे नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली ः गेल्या अनेक दिवसांपासून आपचे नेते संजय सिंह तुरूंगात होते, अखेर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. संजय सिं

गुजरातमध्ये झाले तेच मुंबईत होणार – मंत्री मंगलप्रभात लोढांचा दावा
व्हॉईस ऑफ मीडियाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद नरसाळे यांची निवड
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘अर्धनग्न मोर्चा’

नवी दिल्ली ः गेल्या अनेक दिवसांपासून आपचे नेते संजय सिंह तुरूंगात होते, अखेर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. संजय सिंह यांना गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. या सुनावणीदरम्यान संजय सिंह यांना आणखी दिवस तुरुंगात ठेवण्याची गरज आहे का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने ईडीला केली होती.
साक्षीदारांसमोर त्यांचे म्हणणे होते हे पाहावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. ते 6 महिने तुरुंगात राहिले. ईडीने न्यायालयाला सांगितले की आमचा कोणताही आक्षेप नाही. त्यानंतर न्यायालयाने संजय सिंह यांना जामीन देण्याचा निर्णय दिला. या वर्षी जानेवारीमध्ये दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये संजय सिंह यांचे नाव जोडले होते. यावरून संजय सिंह यांनी चांगलाच गोंधळ घातला होता. खरे तर मे महिन्यात संजय सिंह यांनी दावा केला होता की ईडीने चुकून आपले नाव जोडले होते.ईडीने उत्तर दिले की आमच्या चार्जशीटमध्ये चार ठिकाणी संजय सिंह यांचे नाव लिहिले आहे. यापैकी तीन ठिकाणी नावाचे स्पेलिंग बरोबर आहे. फक्त एकाच ठिकाणी टायपिंगची चूक झाली. त्यानंतर ईडीने संजय सिंह यांना मीडियामध्ये वक्तव्य करू नका, कारण हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, असा सल्ला दिला होता. ईडीच्या आरोपपत्रात संजय सिंह यांच्यावर 82 लाख रुपयांच्या देणग्या घेतल्याचा आरोप आहे. यासंदर्भात बुधवारी ईडीने त्यांच्या घरी पोहोचून त्यांची चौकशी केली. दिल्ली दारू धोरण प्रकरणात ईडीचे दुसरे पुरवणी आरोपपत्र 2 मे रोजी प्रसिद्ध झाले. ज्यामध्ये आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांचेही नाव समोर आले आहे.

COMMENTS