केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

Homeअहमदनगर

केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

अहमदनगर प्रतिनिधी :  स्टेशन रोडवरील सक्खर चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वसंत टेकडी ते केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी

लसीकरणामुळे कोरोनाचा संभाव्य धोका टाळता येतो-डॉ.शरद कोठुळे
अहमदनगर : युनियन बॅंकेत 56 लाखांचा घोटाळा (Video)
मनपाच्या आरोग्य सेवा गरजूंन पर्यंत पोहोचविणार

अहमदनगर प्रतिनिधी : 

स्टेशन रोडवरील सक्खर चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वसंत टेकडी ते केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन दिवसापूर्वी फुटली आहे. 

या जलवाहिनी मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिमेंट गेले आहे जलवाहिनीतून तुंबली असल्यामुळे ताराबाग कॉलनी, एकता कॉलनी ,अमित नगर, श्रीराम कॉलनी, धनश्री कॉलनी, चिपाडे मळा परिसरामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

 तरी लवकरात लवकर दुरूस्तीचे काम हाती घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी महापालिका प्रशासनाला नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली.

       सक्खर चौक येथे केडगाव एमआयडीसीच्या टाकीला कुठली पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली असून पाहणी करताना नगरसेवक मनोज कोतकर, इंजि. गणेश गाडळलकर, शिवराज आनंदकर, बाळू रणे, इंजि. गीते, आदी उपस्थित होते.

COMMENTS