Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कान्होळा नदी परिसरातील जलपर्णी हटवली

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियान -3 मध्ये सहभाग नोंदविला आहे. त्या  अंतर्गत पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बुधवारी

चोरीस गेलेल्या बोअरच्या गाडीचा लागला तामिळनाडूत शोध
Sangamner : जि प सदस्य सिताराम राऊत यांनी शासनाच्या निधीचा केला गैरवापर (Video)
उड्डाणपुलाच्या कामासाठी शासकीय जमीन कमी संपादन करत खाजगी जमीन जास्त संपादन करत असल्याचा आरोप

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत नगरपंचायतने माझी वसुंधरा अभियान -3 मध्ये सहभाग नोंदविला आहे. त्या  अंतर्गत पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बुधवारी कर्जत येथील कान्होला नदी परिसरामध्ये जलपर्णी काढणे, नागेश्‍वर मंदिर परिसरामध्ये स्वच्छतेसाठी सकाळी साडेसहा वाजता नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले, गटनेते, महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योतीताई शेळके, नगरसेविका ताराबाई कुलथे ,उपगटनेते सतीश पाटील, ओंकार तोटे, विषय समिती सभापती तसेच सर्व नगरसेवक, नगर सेविका, सामाजिक संघटनेचे सर्व शिलेदार, नगरपंचायत सर्व सफाई कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित राहून कान्होळा नदी परिसरातील जलपर्णी काढून तसेच नागेश्‍वर मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आली. यावेळी नगरसेविका प्रतिभा भैलुमे, नगरसेवक नामदेव राऊत, सुनील शेलार आदी मान्यवर तसेच नगरपंचायत कर्मचारी संतोष समुद्र, महेश पाचोरे, विलास शिंदे, रविंद्र नेवसे, राकेश गदादे, अवधूत कदम, गोकुळ पवार, सागर राऊत, बुवासाहेब कदम, सर्व महिला व पुरुष सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS