मुदखेड : राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८६ वी जयंती बुधवारी मुदखेड शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सा
मुदखेड : राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची ४८६ वी जयंती बुधवारी मुदखेड शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील मुख्य महाराणा प्रतापसिंह चौक येथे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास मुदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, सामाजिक कार्यकर्ते कैलास गोडसे, गंगाधर डांगे, शंकर राठी, गिरीश कोत्तावार, शिवानंद देवके, मुजीब पठाण, संदीप गाढे, सचिन चंद्रे, प्रमोद देशमुख कामनगावकर, सुनील चव्हाण, नितीन गोडसे, संजय चव्हाण, डॉ. संजय मुंगल, पत्रकार धम्मदत्त कांबळे, कान्होबा बिस्मिल्ले, साईनाथ नरडेले, शरद पवार, माजी सैनिक सुनील चौदंते, शेख बबलू, शेख माजीद, साजिद कुरेशी व पत्रकार हाफिज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या यशस्वी सोहळ्याचे आयोजन प्रीतमसिंग ठाकूर, संतोषसिंग ठाकूर, ओमसिंग ठाकूर व समस्त राजपूत समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. पिंटू ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS